मराठा आंदोलनाविषयी बातमी वाचली आणि मनात लगेच अन्ना हजारेंच आंदोलन आठवलं .अन्नांनी केलेलं ते भ्रष्टाचार विरोधी होत जन लोकपाल आणण्यासाठीचं अऩ्नांच आंदोलन होतं .अन्ना 9 ते 10 उपोषनावर होते. मिडीयाने आंदोलनाला जबरदस्त फेमस केल होतं.जनतेनंही भरपूर पाठींबा दिला होता कारण जनतेला भाजप कॉंग्रेस व्यतीरीक्त एक नवीन पर्याय समोर दिसत होता.बाकी नंतर काय झाल सर्वांना चांगलच माहीत आहे.कोणी काय फायदा घेतला ? अन्ना आज एकटे आहेत.चुल्यावर लाकड ही अन्नांनी रचली तर त्या चुल्यावर पोळी भलतच कुणीतरी भाजून गेलं. असो सध्या लेखाचा हा विषय नसून फक्त आठवन म्हणून आपणास एक आंदोलन सुरुवातीला सांगितलं. भारतात एक पद्धत रुढ झालीय ती म्हणजे आंदोलनातून पक्ष उभारणीची.लेखाचा विषय आहे मराठा आंदोलन आणि लेखातून कुणावरही टिका करण्याचा हेतू नसून फक्त येवढ लक्षात आणून द्यायचय कि आंदोलनउभारायची ती आंदोलन यशस्वी झाली की सरळ पक्ष काढायचा आणि राजकारण्यांच्या मांडीला मांडीलावून बसायच. हे सारं अन्नांच्या दिल्लाच्या आंदोलनातून दिसेल.
मराठा समाजाने सुरुवातीला आंदोलन केलं ते कोपर्डीतील पिडीत महीलेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यानंतर हे आंदोलन बर्याच मागण्या घेवून पुढे आलं . एका गावातून सुरु झालेलं हे आंदोलन एक मराठा लाख मराठा वर जावून पोहचलं.आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद बघता कौतूक करण्यासारख सारखच हे आंदोलन झालं शिस्त बद्ध कुठेच गदारोळ नाही .प्रसारमाध्यमानीही तसेच बर्या जाणकरांनी आंदोलनाच कौतूक केलं . आता ही गोष्ट जोपर्यत हिंसक होत नाही तोपर्यंत ठिक होतीपण नंतर हे सारं हिंसक झालं .आंदोलन करन हे लोकशाहीत गरजेच आहे कुठ आपला हक्क मागायचा असेल तर तो जरूर मागावा पण शांततेन आणि सर्व बाजू मांडून नक्की विरोध करा. प्रकरण कोर्टात असताना आपण कशी सामंजसपणाची भूमिका घेणार हे महत्वाच असत.मागासवर्गीय आयोगाकडे सर्व प्रकरण असताना आरक्षणावर मागासवर्गीय आयोगच योग्य ती भूमिका घेणार हे माहीत असून भारत बंद बर्याच ठिकाणी हिंसक गालबोट आंदोलनाला लागल.कोर्टत प्रकरण आहे तर कोर्ट योग्य ती भूमिका नक्की घेणार कोर्टावर विश्वास ठेवायला हवायपक्ष
भारतात आंदोलन झाल त्या नाव मिळालं त्या आंदोलनाची प्रसिध्दी झाली की त्या रुपांतर पक्षात नक्की होतं .कारण आयतच सारं काही मिळत.ह्या सार्या गोष्टींना विरोध करणे गरजेच आहे. कारण आज भारतात बरेच पक्ष आहेत .त्या पक्षांची स्थापनेची उद्दीष्ट वेगवेगळी असतात.आज कुण्या पक्षातील कुणी नाराज झालं की लगेच स्वतचा पक्ष स्थापन करतो. मराठा आंदोलनाचही आंदोलन लोकांपर्यंत पूर्ण पोहचल प्रसार माध्यमांनी त्या प्रसिध्दी दिली. पण याचा फायदा आज ते पक्ष स्थापनेत करत आहेत . खरच पक्ष स्थापनेची गरज आहे का ? हा प्रश्न पक्ष स्थापन करून सुटणार आहे का ? साधी गोष्टी आहे आजवर कॉंग्रेससारखा तळा गाळापर्यंत गेलेला पक्ष ह्या निवडणूकीत जबर पराभव सहन करतो.पक्ष स्थापन झाल तर तुम्ही ज्या मागणी साठी पक्ष स्थापन करणार आहात ती मागणी पूर्ण होईल का ?दिल्लीतील केजरीवाल अजून ही लोकपाल नाहीआणू शकले.
अजून एक पक्ष स्थापन करून भाजप शिवसेनेला पर्याय देण्याच महाराष्ट्रात राजकारण तर नाही ना सुरु होणार कारण मराठा समाज 36 % आहे. अजून एक पक्ष म्हणजे कॉंग्रेस राष्ट्रवादीचा डाव तर नाही कारण पहीलेही मनसे स्थापन केली मनसेने बरीच सेना भाजपची मते खाल्ली.2009 मध्ये सेना भाजपच सरकार फक्तंफक्त मनसेमुळे आलं नाही.कारण मराठी मत विभागली गेली अन भाजप सेना पराभूत झाली .बर्याच मतदार संघामध्ये मनसेची मते जर सेना भाजपात मिळवली तर भाजप सेनेचा उमेदवार निवडून येणार होता .तो डाव त्या वेळी बरोबर साध्य झाला.कदाचित असाच डाव आताच्या निवडनूकीत आखला जात नसेल यात शंका घेण्यासारख काय असू शकतं . कारण 36 % मराठा मत विभागली जातील आणि विरोधकांना हव तेच साध्य होईल.आज जनता कॉंग्रेस राष्ट्रवादीला कंटाळलीय . मग निवडणूकीत जिंकायच तर हाच पर्याय असू शकतो विरोधकांजवळ असो .
शेवटी एकच सांगण आहे पूर्ण विचार करूनच निर्णय घेण योग्य ठरेल.भलतच कुणी तरी सत्तवर येईल आणि हवा तो उद्देश साध्य होणार नाही .सद्दविवेक बुद्धीने निर्णय व्हावा हीच मराठा आंदोलनाच्या आयोजकांकडून अपेक्षा आहे .तुमच कौतुक झालय कौतुकच होऊ द्या .
विरेंद्र सोनवणे
8888244883