Monday, 8 July 2019

संघ देतो तरी काय?


संघ देतो तरी काय? असच एक लेख तरुण भारतला वाचत होतो .त्यात वाक्य होत संघ देतो तरी काय अन माझ्या मतानुसार संघ देतो तरी काय थोडक्यात लिहीण्याचा प्रयत्न करतोय.90 पेक्षा जास्त अनुभव असलेला तेवढीच पावसाळे खाल्लेला संघ स्वयंसेवकांना देतो तरी काय ? हा प्रश्न नवीन जी कोण लोक आहेत म्हणजे अप्रत्यक्ष स्वयंसेवक त्यांना नक्कीच पडलाय.संघ देतो भरपुर आपण संघाला देणारे कोण ? हा ही प्रश्न नक्कीच पडायला हवाच.माणूस नेहमी व्यवहारीक असतो त्याला बर्याच ठिकाणी व्यवहार दिसतो.अन त्या व्यवहारातच तो प्रश्न विचारुन जातो संघ देतो काय? तर संघ देतो खुप पण घेत काहीच नाही.मग संघ देतो काय ? तर संघ समुद्रासारखा आहे.संघाकडून कितीही शिका कमी तर संघ कितीही जाणून घ्या कमीच.संघ शाखेपासून तर संघ शिबीर ,संघ शिक्षा वर्ग यातून संघ जे देतो ती शिदोरी आयुष्य भरासाठी कामी येते.शाखेत जाण्याच्या पहील्या दिवसापासून तर आजपर्यंत संघातून नेहमी शिकत आलो आहोत अन अजून ही शिकतच आहोत अन आयुष्यभर संघाचे आपण विद्यार्थीच राहणार आहोत.हिंदूनी एकत्रीत राहावे यासाठीच शाखा आहेत.हिंदूंना संघटीत करायलाच हवे नाहीतर ....पुढील धोका जाणूनच डॉ.नी संघ स्थापण केलाय.भगव्याध्वजाला गुरु माणलय म्हणजे व्यक्ती निष्ठ संघ कधीच नाही हेच संघातून दिसतं .संघात अध्यक्ष नाही ना संघात कुणी मोठा,त्यासाठीच संघाने गणवेशही ही समान ठेवलाय कारण आपण सारे एक आहोत.हिंदू आहोत.संघातील सर्व प्रचारकांकडे बघीतलं तर भगव्यासारखा त्याग समोर दिसेल.प्रचारक संघाचा कणा आहे.तर अन तरच संघ ताठ मानेने उभा आहे .संघ शक्ती युगे युगे नाही तर एक दिवस सर्व संघ समाजात विलीन करायचाय.देशाला परमवैभव निर्माण करुन द्याचय.संघ तरुण पिढी घडवतो.लहान पणापासूनच तशी शिकवण असते.संघातल्या बर्याश्या स्वयंसेवकांकडून शिकण्यासारख भरपुर असत.संघ नेतृत्व गुण देतो.संघ 10 लोकांमध्ये कसं बोलाव कस वागाव हेच शिकवतो.खरतर शिबीर त्याच साठी असतात.बर्याच वेळेला मलाही संघाविषयी आश्चर्य वाटतं की खुप मोठे मोठे कार्यक्रम संघ कसा आयोजीत करतो तेही कमी खर्चात नियोजन तंतोतंत असतं खुप दिवसांची स्वयंसेवकांचीमेहणत असते.शिवशक्ती संगम मध्ये ज्यांनी स्वत: हून भाग घेतलाय ते नक्की सांगू शकतील की नियोजन कस होत त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली.दिड लाखापेक्षा जास्त स्वयंसेवक एकाच गणवेशात उभा करन सोपी गोष्ट नव्हती.बर्याच शासकीय कामात संघाची मदत मागीतली जाते . Virendra Sonawane Jalgaon 8888244883

No comments:

Post a Comment