Friday, 20 March 2026

विश्वशांती, विश्वगुरु भारत आणि बुद्धाचा संदेश

 आज जगभर अशांती, युद्ध, द्वेष आणि लोभ पसरलेला आहे. प्रत्येक देश आपली ताकद दाखवण्याच्या स्पर्धेत गुंतलेला आहे. शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत मानवतेचा आवाज हरवतो आहे. या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. कारण भारताला प्राचीन काळापासून विश्वगुरु म्हणून ओळखले जाते.