Sunday, 13 January 2019

भाई :व्यक्ती वल्ली




भाई चित्रपट बघीतला .वल्ली शब्दाचा असा योग्य अर्थ कळलाच नाही .फेसबुकला पोस्टही टाकली बर्याच जऩांनी त्याच योग्य त्यापद्धतीने अर्थ सांगितला.मराठीत खुप असे काही शब्द असतात त्यांचा योग्य तो अर्थ लवकर कळत नाही .व्यक्ती की वल्ली अस म्हटल चित्रपटाच शीर्षक पण व्यक्तीच वल्ली असू शकतो मग व्यक्ती की वल्ली अस का याच मात्र उत्तर काही मिळालं नाही.वल्ली शब्द वाचला अन चित्रपट बघायला गेलो.शब्द वाचला अन शब्दानं अक्षरश: हैरान केलं चित्रपटातून याचा तरी अर्थ मला मिळेल पण निराशा असो वल्ली कि व्यक्ती याच उत्तर शोधायला सिनेमा बघीतला आम्हाला तरी पुल व्यक्ती वल्ली जाणवले.व्यक्ती कि वल्ली हे सांगन कठीणच . फेसबुकची अभासी दुनिया ,त्यात सारेच वल्ली कारण प्रत्येकात काहीना काहीविशिष्ट गुण आहेच.कुणी ह्रदयाला भावेल अशी कविता करत तर कुणी चार ओळीत बरच काही सांगून जातात.कुणी हायकूकार असतात .बरेच गुण एकाच असणारे अवलिया पण असतात.असे विशिष्ट पुर्ण गुण असणारे खरच देवानं त्यांना वरदानच दिलय.यांच्यावर सरस्वतीसह रंगदेवताही प्रसन्न असते.काहींची विनोद बुद्धी तर अचाट असते.हसवूहसवू पार जमिनदोस्त करुन सोडणारे असतात.आज खर्या अर्थाने व्यक्तीमधील व्यक्ती वल्ली शोधतोय.अन ते सापडलेही .पण त्यांची नाव नकोत घ्यायला फक्त वर्णन करतो ते त्यांना नक्कीच समजेल. नाट्य लेखक,कवी,नाट्य विश्लेशक ,स्तंभ लेखक,नट ,दिग्दर्शक ,असे सारे गुण एकाच व्यक्तीत असणारा अवलिया पण आम्हाला फेसबुकच्या दुनियेतुनच मिळलाय.तर त्या खालोखाल नाट्य लेखक कलाकार ,एकपात्री प्रयोग,स्तंभ लेखक ,पत्रकार असा अजूनन एक दुसरा अवलियाही ह्याच अभासि दुनियेतून मिळालाय. याच खास वैशिष्ट्य म्हणजे लिखानासाठी काय मेहनत घ्यावी हे ह्या माणसाकडून शिकाव.सहा महीने एका विशिष्ट विषयावर अभ्यास पुर्ण नाटक लिहीनं अन ते स्वत:उत्कृष्ट रित्या यशस्वी 60 प्रयोग पुर्ण करणारा हाही रंगभुमिसह सरस्वतीच वरदान प्राप्त अवलियाच. काही एकच गुण असलेलेही सरस्वती वरदान प्राप्त अवलियाच.यात चित्रकार असतील ,लेखक असतील स्तंभ लेखक असतील ,कवी असतील त्यांच्या विशिष्ट कला गुणात परीपुर्ण असेच मित्र फेसबुकच्या माध्यमातून मिळालेले व्यक्ती वल्लीच.नाट्य ,कादंबरी लिहीणारा असा कुणी असेल तर ती व्यक्ती म्हणजे देवानं लाखातून एक जन्मास घातलेला कोहीनूर हिराच आहे. भाई चित्रपटात आवडलेला पुलंच्या दुसर्या लग्नातील किस्सा खुप आवडला .दुध ओतू जाण्याच्या आत पुलंच ते लग्न झालं .ज्यात पुलंही बेसावध होते.व्यक्ती वल्ली अन त्याच अस विनोदी लग्न होण स्वाभाविकच होत.ज्या लग्ऩात स्वत:चा मित्र पण नुकताच आंघोळ करुन आलेला ,अन पुल त्याला म्हणतात माझ्या लग्नात तू उघडा आलास.रजिस्टर हे लग्न अस लागेल हे त्याच्याही ध्यानी मनी नव्हतं.अनेक कला गुण बाळगुन असलेला हा अवलिया होणेच नाही.पुलं म्हणजे चमत्कारीक विनोदी जादूच .पुण्यनगरीच्या कुशीत वाढलेला .अशा पुण्यनगरीत या मातीला स्पर्श झालेली व्यक्ती नक्कीच खुप नाव कमवल्या शिवाय राहत नाही.पुल बाळासाहेब ठाकरे लोकमान्य अशी फार मोठी नाव आपण घेऊ शकतो.देवानं योजना करुऩ अशी एखादी व्यक्ती जन्माला घातलेली असावी.खुद्द रंगदेवतेनेच यासाठी उपासना केली असावी तेव्हा असे अद्भुत व्यक्ति वल्ली जन्माला आला.जो आज आपल्यात असंख्य रुपानं जिवंत आहे.असी व्यक्ती कधी मरत नसते . विनोदी नाट्य लिखाण करऩं सोप नाही एक वेळ लिखाण होऊ शकतं कुठल्यातरी गोष्टीवर पण लिहून त्यातून विनोद घडवणं सोप नाही. अन त्यातल्या त्यात परिस्थिती नुरुप विनोद घडवणं अगदीच सोप नाही.एखादी व्यक्ती पुण्यात जन्म घेते म्हणजे ती मुळात व्यक्ती वल्लीच असते.पुणे करांजवळ विनोदी बुद्धी अन हजर जवाबीपणा फार कुटुनकुटून भरलेला असतो.पुण्यात काही प्रसिद्ध म्हणायच तर ते पार जगाशीच त्याची तुलना करतात.भाकरवडी,जोशी वडेवाले,सारस बाग ,शनिवार वाडा अजून बरच काही.पुणेरी पाट्यातर जगात प्रसिद्ध आहेत.कुत्रापासून सावध राहा म्हणतातही पण तिथं मुळात कुत्रा नसतोच .फक्त पाटी लिहूण मोकळे .चहातर विचारूच नका अमृततुल्य,प्रेमाचा चहा सारच काही फेमस तेही जगातच. व्यक्ती वल्ली असच मला जाणवलय नाकी व्यक्ती की वल्ली .असे हे वल्ली जगात नाही पण पुण्यात नक्की मिळतील यात काही शंका नसावी.ब्राह्मणी स्वभावच हो तो.ब्रह्मानंतर जर कुणी असेल तर हे ब्राह्मणी पुणेरीच लोक.त्यामुळेच व्यक्ती वल्ली इथे सापडतात. पुणे तेथे काय उणे.

Monday, 7 January 2019

आमंत्रण रद्द करणे अपमानच



आमंत्रण रद्द करणे अपमानच
हिंदू संस्कृतीत आमंत्रणाला महत्व आहे.आमंत्रण देताना आगंतुक या वगैरे म्हटलं जात. लग्नसमारंभ असेल तर बात निराळीच असते.तो मानापमानाच्या त्या कहान्या सुरु होतात.आमंत्रण रद्द करणे अस काही हिंदू संस्कृतीत आता पर्यंततरी घडलं नसावं.हिंदू समाज लग्न कार्य असेल किंवा इतर महत्वाचे कार्य असतील तर दूष्मनालाही आमंत्रण देतो.अतिथीच असतो अन त्या अतिथीला सन्माने बोलवणे हा खरा धर्म असतो अन तो भ्रष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.कुण्या एका पक्षाच्या व्यक्तीने तक्रार केली अन त्यावरुन त्या धमकी वरुन सारं प्रकरण होण हे तस नियोजितच असावं कारण यामुळे प्रसिद्धी मिळते अन बर्याच लोकांना हा विषय चघळायला मिळालाय.प्रसिद्धीसाठी सारा प्रयत्न चालू आहे.पण एक बाजूला सगळीकडून टिका होत असताना राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केलीय.ह्या साहीत्य परिषदेला वेगळच वळण मिळालय येत्या दोन दिवसात सार्या घडामोडी खुपच नाट्य मय होत आहेत.अन आता हा वादाचा विषय अन जरी साहीत्यकांनी यावर बहिष्काराच पवित्र घेतला असला तरी आयोजक अन संबधीत हे प्रकरण कस हाताळतात याकडेच सार्यांच लक्ष लागून आहे.नयनतारा यांची माफीमागून त्या आमंत्रण स्विकारतील का? अन त्यांनी आमंत्रण स्विकारलच तर इतर संघटना त्यांना नक्कीच विरोध करतील.संमेलनाला गालबोट लागणार नाही याची दक्षता मग घ्यावीच लागेल. सध्या साहीत्य संम्मेलनाची निमंत्रण पत्रिका नयनतारा ह्या इंग्रजी साहीत्यिक महीलेला मिळाली .इंग्रजी साहीत्यात नावजलेली ही लेखिका अन हिच निमंत्रण रद्द होण खुपच मोठी चुक आहे .जरी विचारसरणी वेगळी असली तरी ती चुकच. आधीच समजायला हव होत आपण कुणाला आमंत्रण देत आहोत.संमेलन आयोजकांना सेहगल हे डाव्या विचारसरणीचे आहेत हे माहीत असायला हवे होते .त्यांच्या भाषनातून ते किती प्रखरतेने विचार मांडतील या विषयी पुर्व कल्पना असायला हवी होती.पुरस्कार वापसीतही त्या आघाडीवर होत्या.मग अशा वादग्रस्त व्यक्तींना संमेलनात बोलवण्याचे कारणच नव्हते.अन बोलावलं तर त्यांच्या भाषनाविषयी योग्य ती खबरदारी घेऩे गरजेचे ठरलं असत.प्रत्येक विचारांची व्यक्ती आपले मत योग्य त्या पद्धतीने मांडू शकते पण त्यातून वाद होणार नाही याचीही खबरदार घ्यायला हवीच.मराठी संस्कृतीत आमंत्रण रद्द करणे शोभणीय नाही.आयोजकांनी याचाही विचार करायला हवा होता.डाव्याविचारसरणीची व्यक्ती बोलवून वाद ओढवून घेतलाय.कारण आता डाव्या विचारसरणीला विरोध करणारे बरेच आहेत.तेव्हा संमेलनाला गालबोट लागणार नाही याचीही काळजी घेनं गरजेच आहे.भविष्यात असली चुक होणार नाही याची काळजी आयोजकांना घ्यावी लागेलच.विदर्भातील या साहीत्य संमेलनात तेथील शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फाडणार्या साहीत्यिकाला निमंत्रण दिलं असत तर ते अधिकच योग्य ठरलं असतं.मराठी साहीत्य संमेलनात इंग्रजी साहीत्यिकाला बोलवण योग्य नाही.त्यापेक्षा एखाद्या शेतकर्याच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल असतं तर शेतकर्यांनाही वाटल असतं की आपल्याही बाजून कुणीतरी आहे.सद्द्य परीस्थिती,विचारवंतांच्या हत्या,अभिव्यक्ती स्वातंत्र्य झुंडशाही यावरच नयनतारा सेहगल बोलणार होत्या असे बर्याच वर्तमानपत्रातून स्पष्ट म्हटलय. अन नयनतारांनीही स्पष्ट केलय की माझ भाषन मी अगोदरच आयोजकांना पाठवलय मग आयोजकांना साद कळू ही का .?मग आमंत्रण देऊन अपमान का केला?साहीत्य परिषदेत राजकारण येन म्हणजे नक्की फार मोठ दुर्दैव आहे मराठी साहीत्याच.त्याच्या राजकारणाचा फायदा नक्कीच राजकारणी घेत आहेत.तिकडे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलय की महामंडळ एक स्वायत्त संस्था आहे.त्यात सरकारचा काही हस्तक्षेप नाही.