Monday, 7 January 2019

आमंत्रण रद्द करणे अपमानच



आमंत्रण रद्द करणे अपमानच
हिंदू संस्कृतीत आमंत्रणाला महत्व आहे.आमंत्रण देताना आगंतुक या वगैरे म्हटलं जात. लग्नसमारंभ असेल तर बात निराळीच असते.तो मानापमानाच्या त्या कहान्या सुरु होतात.आमंत्रण रद्द करणे अस काही हिंदू संस्कृतीत आता पर्यंततरी घडलं नसावं.हिंदू समाज लग्न कार्य असेल किंवा इतर महत्वाचे कार्य असतील तर दूष्मनालाही आमंत्रण देतो.अतिथीच असतो अन त्या अतिथीला सन्माने बोलवणे हा खरा धर्म असतो अन तो भ्रष्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे.कुण्या एका पक्षाच्या व्यक्तीने तक्रार केली अन त्यावरुन त्या धमकी वरुन सारं प्रकरण होण हे तस नियोजितच असावं कारण यामुळे प्रसिद्धी मिळते अन बर्याच लोकांना हा विषय चघळायला मिळालाय.प्रसिद्धीसाठी सारा प्रयत्न चालू आहे.पण एक बाजूला सगळीकडून टिका होत असताना राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केलीय.ह्या साहीत्य परिषदेला वेगळच वळण मिळालय येत्या दोन दिवसात सार्या घडामोडी खुपच नाट्य मय होत आहेत.अन आता हा वादाचा विषय अन जरी साहीत्यकांनी यावर बहिष्काराच पवित्र घेतला असला तरी आयोजक अन संबधीत हे प्रकरण कस हाताळतात याकडेच सार्यांच लक्ष लागून आहे.नयनतारा यांची माफीमागून त्या आमंत्रण स्विकारतील का? अन त्यांनी आमंत्रण स्विकारलच तर इतर संघटना त्यांना नक्कीच विरोध करतील.संमेलनाला गालबोट लागणार नाही याची दक्षता मग घ्यावीच लागेल. सध्या साहीत्य संम्मेलनाची निमंत्रण पत्रिका नयनतारा ह्या इंग्रजी साहीत्यिक महीलेला मिळाली .इंग्रजी साहीत्यात नावजलेली ही लेखिका अन हिच निमंत्रण रद्द होण खुपच मोठी चुक आहे .जरी विचारसरणी वेगळी असली तरी ती चुकच. आधीच समजायला हव होत आपण कुणाला आमंत्रण देत आहोत.संमेलन आयोजकांना सेहगल हे डाव्या विचारसरणीचे आहेत हे माहीत असायला हवे होते .त्यांच्या भाषनातून ते किती प्रखरतेने विचार मांडतील या विषयी पुर्व कल्पना असायला हवी होती.पुरस्कार वापसीतही त्या आघाडीवर होत्या.मग अशा वादग्रस्त व्यक्तींना संमेलनात बोलवण्याचे कारणच नव्हते.अन बोलावलं तर त्यांच्या भाषनाविषयी योग्य ती खबरदारी घेऩे गरजेचे ठरलं असत.प्रत्येक विचारांची व्यक्ती आपले मत योग्य त्या पद्धतीने मांडू शकते पण त्यातून वाद होणार नाही याचीही खबरदार घ्यायला हवीच.मराठी संस्कृतीत आमंत्रण रद्द करणे शोभणीय नाही.आयोजकांनी याचाही विचार करायला हवा होता.डाव्याविचारसरणीची व्यक्ती बोलवून वाद ओढवून घेतलाय.कारण आता डाव्या विचारसरणीला विरोध करणारे बरेच आहेत.तेव्हा संमेलनाला गालबोट लागणार नाही याचीही काळजी घेनं गरजेच आहे.भविष्यात असली चुक होणार नाही याची काळजी आयोजकांना घ्यावी लागेलच.विदर्भातील या साहीत्य संमेलनात तेथील शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फाडणार्या साहीत्यिकाला निमंत्रण दिलं असत तर ते अधिकच योग्य ठरलं असतं.मराठी साहीत्य संमेलनात इंग्रजी साहीत्यिकाला बोलवण योग्य नाही.त्यापेक्षा एखाद्या शेतकर्याच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाल असतं तर शेतकर्यांनाही वाटल असतं की आपल्याही बाजून कुणीतरी आहे.सद्द्य परीस्थिती,विचारवंतांच्या हत्या,अभिव्यक्ती स्वातंत्र्य झुंडशाही यावरच नयनतारा सेहगल बोलणार होत्या असे बर्याच वर्तमानपत्रातून स्पष्ट म्हटलय. अन नयनतारांनीही स्पष्ट केलय की माझ भाषन मी अगोदरच आयोजकांना पाठवलय मग आयोजकांना साद कळू ही का .?मग आमंत्रण देऊन अपमान का केला?साहीत्य परिषदेत राजकारण येन म्हणजे नक्की फार मोठ दुर्दैव आहे मराठी साहीत्याच.त्याच्या राजकारणाचा फायदा नक्कीच राजकारणी घेत आहेत.तिकडे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलय की महामंडळ एक स्वायत्त संस्था आहे.त्यात सरकारचा काही हस्तक्षेप नाही.

No comments:

Post a Comment