
style="text-align: left;" trbidi="on">
युतीच जागा वाटप खड्ड्यातून बाहेर
भाजप सेनेची युती झालीय अन उद्धवरावांच सर्व टिका विसरुन सेना युतीत सामिल झालीय.आधी राम मंदीर मग सरकार ही घोषणा पण पोकळ निघाली.भाषण बाजी करायची अन तस न वागता सरळ युती करायची यात नक्की जनतेला काय सांगायचय.जनता युती ठरवणार होती मग तुम्ही घोषणा करणारे ?भाषण करताना विचार नव्हता केला का?आता जागा वाटप खड्यातून कस काय बाहेर आलं .144 जागांचा प्रस्ताव भाजप ने कसे मान्य केले .?122 जागा भाजप जिंकत अन आता निवडणूकीच्या तोंडावर युती केलीय.भाजपने युती करुन आधीच हार मानलेली दिसतेय.तर तिकडे आघाडीची अजून जागा वाटप ठरलेल.त्यांनाही ही निवडणूक नक्की महाग जाणार आहे.कारण आधीच्या निवडणूकांची आकडेवारी सर्वच पक्षांना बेचैन करतेय.प्रत्येकालाच वाटतय आपण निवडणूक जिंकू.पण नक्की पुढे काय होणार हे एक तर सर्वेतून अंदाज घेवू शकू किंवा निकालातच काय ते स्पष्ट होईल.आघाडीतही वंचित आघाडीला सामिल व्हायचय पण जागा वाटपाच गणित ठरलेल नाही.
भाजप सेना जरी युती होत असली तर इतर पक्ष जागा वाटपांपासून वंचित आहेत.त्यांनाही युतीला जागा द्याव्या लागतील.पण उद्धव राव का नमले आहेत हाही गंभार प्रश्न आहे.त्यांनाही कळलय की भाजप शिवाय पर्याय नाही.भाजपच आपल्याला सत्तेपर्यंत पोहचवू शकतो.तिकडे भाजप खासदार राणे युती मुळे बंड करतील यात शंकाच नको.एकेकाळी युतीचे मुख्यमंत्री असणारे राणे यांची आज काय परीस्थिती झालीय.
मोदी लाट नक्की आहे का ? हाही प्रश्न मतदारांसह नेत्यांनाही पडलाच असेल कारण प्रचारात एकमेंकांवर टिका करणारे एकत्र येत आहेत.मागील आकडेवारी बघता युतीचच सरकार येईल हे नक्की .पण भविष्यात भाजपची कोंडी सेना करणार नाही याची काहीच गँरंटी नाही देऊ शकत. कारण सेना शब्द बदलावू पक्ष आहे.हे आता युती करुन सेनेनं दाखवून दिलय.युती झाली तरी ती किती जनतेला आवडलीय हे पुढचा काळच ठरवेल.युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना बंडाळीला तोंड द्यावच लागेल.भाजपचा उमेदवार असताना सेनेचे मतदार भाजपला मत देतील युती धर्म पाळला जाईल का ही पण शंका व्यक्त होईल.अस झाल तर नक्कीच त्याचा परीणाम निकालावर होईल.हे फक्त युतीतच होईल अस नाही तर आघाडीतही होऊ शकतं.
भाजप सेना जिंकेल अस दिसत असलं तरी युती करुन युतीला जास्त जागा म्हणजे 145 चा आकडा पार होईल ?तर नाही हा आकडा ना युती पुर्ण करेल ना आघाडी .भाजप सेना युती करुन 120 पर्यंत जाऊ शकतात तर आघाडी 110 ते 130 पर्यंत जातील तर अपक्ष 25 अन इतर 23 जागा मिळवतील असा अंदाज आहे .कारण जनतेचा राग दोघांवर आहे.अशा परीस्थितीच मनसे सह इतर पक्ष ही जागा घेतील हे मात्र नक्की.
Virendra Sonawane
Jalgaon
No comments:
Post a Comment