आयाराम गयारामांची विचारसरणी
2019 कोण निवडून येईल हे नंतर बघू पण आधी आपण ज्या पक्षाला मतदान करणार आहोत त्या पक्षातील उमेदवाराची आधी माहीती घ्या ? हिंदूत्ववादी आहे का? देशहितसह समाज हिताच काम करणार आहे का?आयाराम असेल तर मुळीच त्याला मतदान करु नये.याविषयी सविस्तर मी सांगणाच आहे.
नेता स्वस्वार्थाने पक्ष बदलतो.हे मात्र जग जाहीर आहे.जो कुणी पक्ष बदलतो तो नक्की एका विचारसरणीचा आहे का?तर उत्तर मिळेल मुळीच नाही.तो हिंदूत्व असू शकतो का तर नाही कारण पक्ष बदला की विचार बदलतात मग सेक्युलर वाला हिंदूत्ववादी विचारांचा होईल तर नाही.मग त्याच्यावर विश्वास पण बसणार नाही कारण पुढच्या वेळेला तो पक्ष बदलेल यात शंकाच नाही.आता तुम्ही म्हणणार पक्षांतर कायदा आहे.त्या उमेदवाराला पक्ष सांगेल तसच वागाव लागतं.पण असे उदाहरणही बरीच आहेत की नेते पक्षाच ऐकतात.?हा मात्र संशोधनाचा विषय आहे.निवडणूक पद्धत भारताची नि:पक्षपाती पणे होते मग मध्यंतरी अण्णा हजारे बोलले की उमेदवाराचा फोटो असावा तर अगदी योग्य आहे.चिन्हाने निवडणूक पक्ष पाती होऊच शकत नाही.
उमेदवाराला आपण मतदान देतो.मग कुण्या एका नेत्याच्या नावाने मत मागितले जावे हे लोकशाहीला खुपच घातक आहे.देशहितासाठी कोण योग्य तर आताची परीस्थिती मोदींकडे बोट दाखवते आहे.मग फक्त काय मोदींच्याच नावाने किंवा मोदीसमजून उमेदवारांना मतदान करायच का तर मुळीच नाही.उमेदवारही मोदींच्याच बरोबरीचा असावा.मोदींसारखे त्याच्यात गुण असावेत.संघातल्याच बर्याचश्या लोकांना राजकारणात आणण्याची खुप गरज आहे.
अन हो मतदारानेही थोड्याश्या चिरीमिरीला बळी न पडता 100 % मतदान करायला हवय.चिरीमिरी घेवून देशाच नुकसान का करावे? आपण सारे सुज्ञ नागरीक आहोत.देशहितासाठी मोदीसह मोदींचा सहयोगीही योग्य निवडावा.जय हिंद जय भारत
विरेंद्र सोनवणे
८८८८२४४८८३
No comments:
Post a Comment