
अधिक माहिती साठी
गेली आठ ते दहा दिवस एन आर सी कँब वगैरे वगैरे गप्पा फेसबुक वर चालू आहेत.पण खर नक्कि एन आर सी काय अन कँब जनतेच्या मनात आजही संभ्रम अवस्था आहे.कँब सी एए निर्णय चांगलाच आहे पण एन आर सी नक्कि काय प्रकरण आहे आज पर्यंत कुणाला माहीत नाही.नागरिकांच्या मनात कॉंग्रेस सुनियोजित विष पेहरत आहे अन ते विष विद्यार्थ्यांमार्फत संपुर्ण देश भर पसरवल जात आहे.दोघही गोष्टी पुर्ण वेगळ्या आहेत .कँब सीएए म्हणजे पाक बांग्लादेश अफगाण या राष्ट्रातील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देणे तर एन आर सी हा कायदा नसून ती फक्त कोर्टाकडून केलेली नोंदणी आहे.अन देशातल्या तणावाच्या वातावरणाला भाजपही जबाबदार आहे.कारण कायदा व्यवस्थित जनतेपर्यंत समजून सांगायला हवा होता जे भाजप ने केले नाही मग याचाच फायदा कॉंग्रेसने उचलला अन आज देशात तणावाच वातावरण निर्माण झालंnrc म्हणजे काय ? तर फक्त ती एक नोंदणी असून आसाम राज्यात ज्या प्रमाणे नोंदणी झाली तशीच सम्पूर्ण देशात व्हावी अशी अपेक्षा भाजपचे चाणक्य म्हणत आहेत . आसाम हे सीमावर्ती राज्य मग अशा भागात nrc हि करावीच लागणार पण संपूर्ण भारतात nrc म्हणजे निव्वड वेळ खाऊ धोरण आहे. ही उपाययोजना नाहीच. nrc झाल्यावर पण घुसखोर भारत येणार नाही हे कशावरून ? प्रशासनाला हा फक्त त्रास आहे याने काहीच सिद्ध होणार नाही.भाडेकरुंना जस पोलीस पळताळणीची गरज असते किंवा तसा नियम असताना फक्त पोलीस प्रशासनाने काम चोख बजावलं तर nrc ची गरजच नाही. प्रत्येक राज्यात राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात nrc ऑफिस असतील तिथं कर्मचारी वर्ग कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने हे काम करून चालणार नाही . सरकारी कर्मचारीच त्याला हवा अन सरकारी कर्मचाऱ्यांना हे काम दिल्यास त्यांना त्यांच्या इतर कर्तव्यातुन मुक्त करावं लागेल. आधीच सरकारी कर्मचारी भरती होत नाही त्यात हे काम वाढणार मग सरकारी कर्मचाऱ्यांना केवढा तो त्रास असेल . एक वेळ मान्य करू हा त्रास हि ते सहन करतील. पण इतर कामाचं काय ते आधीच पडून आहेत. ते कोण करेल. एक वर्षासाठी प्रॉब्लेम समजून घेतला तरी एवढा पैसे खर्च होईल त्या नंतरही काही त्रुटी राहिल्या तरी संपूर्ण nrc प्रक्रिया fail गेली समजायची. एक घुसखोर सापडण्याची संपूर्ण जनतेला त्रास देणं चुकीचं आहे. मान्य करू पुणे मुंबई वगैरे सारख्याच शहरात जास्त घुसखोर असतील हि पण त्याच प्रमाण हे आपण सांगू शकत नाही पण पोलीस यंत्रणा तेवढी भक्कम असायला हवीच. कारण १३० करोड च्या देशात तुम्हाला सर्व यंत्रणा अन गुप्तचर खात अधिक बळकट करायला हवं तर अन तरच घुसखोरानं आळा बसेल नाही तर गाढवासारख कामच कराव लागेल. nrc म्हणजे काय जास्त काळ साठीची उपाय योजना नाही. ९९. ९९% जनतेची nrc झाली तरी ०.०१ % पण त्रुटी देशाला घातकच आहे. मग तुमचा nrc करून काही उपयोग नाही. १००% nrc नक्की कशी होईल कारण आधार कार्ड ची नोंदणी आज हि फक्त ९० % पर्यंतच झाली आहे. एखाद राज्यापुरता किंवा सीमा भागांत हे ठीक आहे पण संपूर्ण देशात nrc चा काय उपयोग ? यावरून एक गोष्ट आठवली अकबर बिरबलची अकबर सैनिकांना आदेश देतात कि राज्यातील सर्व घुसखोरांना गुंडांना पकडून आणा. आदेशानुसार सर्व चोर घुसखोर पकडले जातात पण एका रात्री अकबराचा एक सैनिक त्याला येऊन सांगतो कि राज्यात अजून घुसखोर आहे जो वेषांतर करून राहत आहे अन त्याला माझ्या भाची ने बघितले आहे. दुसऱ्या दिवशी बिरबल ला हे सांगितलं जात अन बिरबल त्यावर विचार करून त्या घुसखोर चोराचा शोध घेतो. अन तो घूस खोर सापडतो. हि कहाणी सांगायचे कारण अस कि सर्व घुसखोर सापडले अस nrc नंतर वाटलं तरी काही घुसखोर वेषांतर करूनच राहत असणार. कुणीही आपली कागद पत्र देऊन ह्या भारताचा नागरिक आहे ठरवू शकतो. भारतात झालेले बरेच बॉम्बब्लास्ट बघता आपली यंत्रणा किती कूच कमी होती हेच समोर येत. तेव्हा कागदपत्रांवर घुसखोर सापडणं खूपच अवघड काम आहे त्यांना सापडवण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट कराव्या लागतील.
इस्राइल च्या सुरक्षा व्यवस्थेसारखे कडे सीमा भागांवर लावावे लागेल. आज इस्राईल पूर्ण पणे स्वयंचलित यंत्रणेवर म्हणजेच रोबोट गार्ड वर चालू आहे. तेथील सुरक्षा व्यवस्था मानव रहित असून १००% खात्रीच्या आहेत हि घुसखोर देशात घुसणार नाहीत तेव्हा अशाच पद्धतीचं तंत्रज्ञात भारताने घ्याव जेणे करून सीमा भागांवर सैनिक मारले जाणार नाहीत. आज इस्राईल एक सैनिकांनीच महत्व काय असत हे चांगलाच माहित आहे. भारतानेही हे महत्व जाणून सीमा भागात मानवरहित तंत्रज्ञान आणावं. आता तुम्ही म्हणाल बाहेरील सुरक्षेचा अन भारतातील घुसखोरीचा काय संबंध तर घुसखोर हे बाहेरूनच आत आलेलं असतात किंवा विदेशी पर्यटनाच्या बहाण्याने आलेले असतात. अन सरळ देशात घुसून दंगे खोरी करतात. मुंबई हल्ला झाला तेव्हा हे सागरी मार्गे आले होते . अन अशा घुसखोरांना रोखण्यासाठी मानवरहित रोबोट गार्डच योग्य आहेत.तेव्हा यावर सरकारने विचार करावा. अन घुसखोर शोधण्यासाठी विशेष उपाय योजना कराव्यात. nrc हा काय उपाय होऊ शकत नाही .
No comments:
Post a Comment