Monday, 8 October 2018

नक्की गुन्हा कुणाचा ?


वैद्यकिय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्स, अन इतर कर्मचारी वर्ग यांच्याबाबत आदर तर नक्की आहे.पण आधी त्यानी त्यांची जबाबदारी काळजीपुर्वक पूर्ण केली पाहीजे. आपल्या चुकीमुळे कुणाचा जीव जाणार नाही याची 101% खात्रीने काम केले पाहीजे.पण नक्की ही मंडळी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का?कारण व्यक्ती आजारी असला की डॉक्टरांकडे जातोच .पण डॉक्टर हूशार असेल तर व्यवस्थित इलाज करेल नाही तर ?
         काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे आमचे आजोबा एका  दवाखान्यात अँडमिट होते अन त्यांच्यावर उपचार चालू होता. आता मी त्या दवाखान्याच नाव घेऊ इच्छीत नाही . आजोबा अति दक्षता विभागात होते.खर सांगायच तर आज पर्यंत डॉक्टरांना माझ्या आजोबांना कुठला आजार झाला होता ते सांगताच आले नाही.अतिदक्षता विभागात डॉक्टर नक्की काय करत होते तेच कळू देत नव्हते.अन बील लाखोनं फाडलं . पण ईलाज काय केला हेच मात्र कळू दिल नाही . ही अशी परीस्थिती माझ्या आजोबांच्या उपचाराविषयी नाही तर बर्याच वैद्य किय दवाखान्याविषयी असली परीस्थिती असावी . डॉक्टरांनाही जसी शिक्षकांनी परीक्षा आहे तशी दर 3 वर्षांनी परीक्षा असायला हवी. तिही प्रात्यक्षिक परीक्षा डॉक्टर इलाज कसा करतोय हे प्रशासनाने नक्की तपासलं पाहीजे.डॉक्टर नापास झाला तर तात्काळ परवाना रद्द केला पाहीजे.नाही तर हे असच चालू राहीलं तर कित्येक रुग्णांचे प्राण जातील.
         आपणही काळजी घ्यायला हवी .नक्की डॉक्टराकडे वैद्यकीय परवाना आहे का? हे आर्वजून बघीतलं पाहीजे.इंजक्जन घेते वेळी ते नवीन पँक मधील आहे का तपासलं पाहीजे.दवाखान्यातील सुविधांविषयी शासन किती जागृत आहे हे पाहीलं पाहीजे.
    आज खेडोपाडी दवाखान्यांची अवस्था बघीतली तर गुरांचा तरी दवाखाना बरा असेल?सरकारी दवाखान्यांमध्ये पुर्ण वेळ डॉक्टर नसतात. सरकारी डॉक्टराचा स्वत:चा दवाखाना असतो. डॉक्टरांच अर्ध काम नर्सच करतात. खेड्यात जर बघाल कुणी आजारी पडलं किंवा सिरियस असेल तर डॉक्टर जागेवर नसतात उपचाराअभावी रुग्ण दगावतात.
काल परवाची फेसबूक वर एक कसब्यातील एकाइसमाची पोस्ट वाचली अन डोळ्यात पाणी आलं.एकुलता एक वंशाचा दिवा ह्या डॉक्टरांच्या निष्काळजी पणामुळे विजवला .डॉक्टरांच्या असल्या निष्काळजी पणाविरोधात कठोर कायदा करावा .मी तर म्हणेन असल्या डॉक्टरांना फाशीच द्या?302 कलम लावा.
           बर्याच वेळेला रुग्णांना पैशांअभावी डॉक्टर उपचार करत नाही किंवा मला आता झोपायचय हे कारण देऊन उपचार करत नाही. खर तर डॉक्टरांनी 24 तास हे ईश्वरी कार्य स्वीकारायला हवे . फेक डॉक्टरांना  शोधून त्यांच्यावर302 गुन्हा नोंदवला पाहीजे.
          डॉक्टरांनी स्वत: ह्या सार्या गोष्टी समजून घेतल्या पाहीजेत. पण काही वेळेला डॉक्टरही बरोबर असतात पूर्ण दोषी आपण डॉक्टरांना म्हणू शकत नाही जीवापाड मेहनत करुन ते डॉक्टर झालेले असतात .खुप हुशार ही असतात. पण शिक्षणालाही एवढा पैसा लागतो की तो डॉक्टर राहत नाही त्याचा तो व्यवसाय होतो मग फायद्यासाठी नको त्या गोष्टी होतात. डॉक्टर व्हायचं असेल तर 5 करोड तर कमी पडतात. मग हा पैसा ते रुग्णाकडून पूरेपूर वसूल करतात . शासन ह्या कडे कधी लक्ष देईल ?ह्यात शासनाची फार महत्वाची जबाबदारी आहे.शासनाने डॉक्टरांचे परवान दर वर्षी तपासले पाहीजेत .
Virendra Sonawane
8888244883

No comments:

Post a Comment