छंद कलाकारांच्या भेटीचा
छंद वेगवेगळे असू शकतात. नाणी गोळा करण्याचा ,लेख संग्रहीत करण्याचा,अजून काही बरीच छंद असू शकतात. मला गेली चार ते पाच वर्षांपासून मराठी कलाकारांबरोबर फोटो काढून तो फेसबुकवर पोस्ट करण्याचा आगळा वेगळा छंद आहे. अन तो मी आजही तसाच चालू ठवलाय.कलाकारांबरोबर फोटो काढून सोशल मिडीयात फोटो आला की विचारणा व्हायची कुठे भेटतात तुला ही मंडळी पण हा माझा एक आगळा वेगळा छंद आहे हे कुणाला सांगितलही नव्हत आज त्याबाबत सविस्तर लिहीत आहे.
मी पाहीलेल पहील "नाटक करुऩ गेलो गाव" अतिशय विनादी नाटक अन चांगल नाटक अर्थात दोन ते तीन मराठी रंगभूमी गाजवलेले कलाकार भाऊ आणि वैभव मांगले मांडलेकर वगैरे मंडळी होती त्या नाटकात मग काय मनोरंजनाचा खजिनाच सापडला होता .तेव्हा मी सर्वांबरोबर फोटो काढला अन फेसबुकला टाकला . फेसबुकलाही फोटो टाकण्याच फक्त लाईक कमेंट वगैरे मुळात कारणच नव्हत तर कारण वेगळच होतं .फोटो टाकला तर सोशल मिडीयात चर्चा अन चर्चा झाली कुणी तर नाटकाचा विषय काढणार नाटकाला जाणार यातून मराठी नाट्य सृष्टी साठी फुल नाही पण फुलाची पाकळी का होईना हातभार लावल्याच समाधान अंगी बाळगून हा छंदच जोपासून घेतलाय.
खर तर मराठी रंग भूमी जी टिकून आहे ती म्हणजे कलाकारांचे अथक परीश्रम अन आपल्या सारखे रसिक मंडळी यांमुळेच .नाहीतर रंगभूमी ची सेवा करणार कुणी उरलं नसत. रंगभुमी ही सार्यांची आहे अन तिला टिकवणे आपले कर्तव्य आहेच.
पुण्याती रसिक मंडळीला सारेच घाबरुन असतात तर प्रत्येक कलाकाराला प्रत्येक प्रयोगाच टेंशन असतच . पण ते टेंशन पुण्यात जास्त असत. कारण पुणेरी प्रेक्षकहा खुप अभ्यासू अन हूशार कलाकारांची चुक लगेच काढून कलाकाराच्या तोंडावर बोलणारा प्रेक्षक वर्ग पुण्यात जास्त आहे.कलाकारही पुण्यातील प्रेक्षकांविषयी आवर्जून सांगत असतात.कलाकारांनाही पुण्यातील प्रेक्षकांचा राग येत नाही ते त्यांना मार्गदर्शन जास्त वाटत.आईने मुलगा चुकला की जसा त्याचा कान पकडावा तसा पुणेरी रसिक माय बाप कलाकारांचा कान पकडत असतो.
आतापर्यत पंन्नास कलाकारांना भेटून झालय तर सत्तर पेक्षा जास्त नाटक बघून झाली आहेत. कलाकारांबरोबर जसा फोटो काढण्याच छंद आहे तसा जास्तीत जास्त नाटक बघण्याचाही छंद आहेच.

No comments:
Post a Comment