Saturday, 24 November 2018

कार्टातील रामाचे मनोगत


कार्टातील रामाचे मनोगत
हिंदू समाजाचा नव्हे नव्हे हिंदू धर्माची अस्मिता मरण पावतेय मंदीर अयोध्येत न बांधल्यामुळे ,शहाण्यानं कार्टाची पायरी चढू नये अस म्हटलं जातं अन इकडे प्रभूंनाच कार्टात उभ केलय.सर्व धर्मावर चिडलेलें राम यांच मनोगत ,सद्यपरीस्थिती काय असेल याची फक्त साधी कल्पना केलीय.
        प्रभू श्रीराम म्हणतात,मानवा तू किती स्वार्थी मतदानाच्या राजकारणासाठी तू मला गेली 20 वर्ष कोर्टात उभ केलय.तुम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं तर मंदीर कधीच होईल . मला कोर्टाच्या फेर्या कराव्या लागणार नाही.पण राजकारण, यासाठीच हे मंदीराचं घोंगळ असच भिजत ठेवलय.
      माझ्या नावावर तुम्ही फाव्ह स्टार लक्झरी आयुष्य जगा ,मी आपला राहतो ,त्याच मोडक्या जेमतेम बांधलेल्या तोडक्या मोडक्या मंदीरात ,तुम्हाला काय फक्तहा विषय चघळायला मिळाला की चांगलं.तिकडे मिडीयालाही ,दररोज मंदीर कधी ,मंदीराच काय हे प्रश्न विचारावेसे वाटतात पण कुणीच सकारात्मक पाऊल कोणी उचलत नाही.12 वर्ष वनवासानंतर तुमचा हा स्वार्थी वनवास मला सदैव आघात करणारा ठरत आहे.माझं ह्या स्वार्थी कलीयुगात राहणं ही योग्य नाही. बरच पाप वाढत आहे, कुणाच कुणाशी पटत नाही,अत्याचार होत आहेत तर कुणी भ्रष्टाचार करत आहे.माझ्या नावानं मलाच बदनाम करत आहेत. स्वार्थी माणसा जागा हो.
         मी चरा चरात जरी असलो तरी मंदीरामुळे माझा हिंदू समाज हिंदू धर्म एक होईल. अधर्म्याने कित्येक वर्षांपूर्वी माझ मंदीर बांधलेलं पाडलं .पापालाही सुरुवात झाली.मी मुकाट होतो कारण मी माऩवाचे ही कृत्ये बघत होतो.तेव्हा पासून मी बघतोय मानव कीती क्रुर अन स्वार्थी आहे.आज मात्र मी हाक देतोय .माझं मंदीर ह्या स्वार्थी माणसाकडून कधीच होणार नाही कारण त्याला तशी आवश्यकताही नाही. माझी शपथ ही ह्या माणसाला लागत नाही .
         खरतर तु सुखी राहावास असच मला वाटतं .तुझी निस्वार्थ भक्ती मला हवी आहे.दंगे करुन लढाई करुन मिळवलेलं मंदीर मला नकोय.कित्येक जीव फक्त माझ्या मुळे जातील तेही मला नकोय .ढाचा पाडला लाखो जीव गेले .तुम्ही जाव अन आरामात मंदीरा राहवं हेही मला नकोय. स्वार्थ सोड मानवा अन मंदीर कस शांततेत बांधता येईल त्याचा विचार कर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तु दररोज दिवसातून किती वेळेला माझी पुजा करतो ,मी तुझ्या मनात किती आहे ह्रदयात किती आहे हे बघ. महाभारत रामायण कधी वाचलय का? गीता कधी वाचलीय ? याचाही विचार कर .जागा हो उठ. 
        माझ्या कोर्टातील वार्या कधी संपतील. तु दरवेळेला टाईम काढून नेत जा .कोर्टात केस पुढे पुढे ढकलत जा म्हणजे मी बरीच वर्ष असाच कोर्टाच्या पायरीवर बसलेला असेल.कोर्टालाही बरोबर असच खेळव कारण कोर्टही मला फारसं महत्व देत नाही.तुझ्या पापंमुळं माझी जादूच काही काम करत नाही.मी येवढ्या विश्वाचं कोर्ट चालवतो पण तुझ्या कोर्टात मलाच न्याय मिळत नाही. कारण तु मानवा स्वार्थी आहेस. 
      

No comments:

Post a Comment