Sunday, 9 December 2018

अजर अमर अटलजी

16 आँगस्ट  2018 रोजी अटल पर्व संपल अस बर्या वर्तमान पत्रातून लिहील होत.अटल जींच्या जाण्याने आख्खादेश हळहळला.अटल कवी ,लेखक,पत्रकार बरोबरच राजकारणी ही होते.लेखात फक्त गेल्यातीन दिवसांबद्दल झालेल्या घटना सांगतोय.
       अटलजी 44 तास त्यांची प्रकृती चिंताजनक होती.अन सर्व न्युज चँनल वाल्याना त्यांची जाण्याची एवढी घाई झाली होती की बस.काय हा टिआरपीचा भुकेला मिडीया हे सार चिड  येण्या सारख होत.सोशल मिडीयाही याला अपवाद नव्हता.सर्वच अटलजी जाण्यावर टपून बसले होते. ते जाण्या अगोदरच श्रद्धांजली वाहीली जात होती.एकी कडे सर्व देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता तर एकी कडे ह्या मंडळीला अटलजी कधी एकदाचे जातात अस  झाल होत.हासारा प्रकार संतापजनक होता.चँनलवाल्यानीतर स्पर्धाच सुरु केली होती अटलजी यांच्या जाण्याची बातमी कोण आधी देत.खरच थोडीही जाणीव नसावी का ह्या मंडळींना आपण करतो काय आहे याची की फक्त टिआरपीचा हव्यास अन तोही अशा वेळेला काय म्हणावे यांना तेच कळत नाही अशा लोकांना.
   अटलजी हे काहींसाठी देव होते काहींसाठी गुरु होते अशा महान रुषीतुल्य व्यक्तीविषयी शब्द अपुरे आहेत.बर्याच देशानी आपल्या देशाचे राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणला होता तर बर्याच देशांच्या प्रमुखांनी आपल्या भावना व्यक्त करुन ह्या रुषीस श्रद्धाजली वाहीली.भुटान  अफगानीस्तान नेपाळ यांचे प्रमुख अटलजींच्या अंतिम यात्रेत सहभागी होते.इस्राईलने म्हटले कि खरा मित्र आम्हास सोडुन गेला.अशाया नेत्याच्या महतीला सलाम खरच अटलजी आंतरराष्ट्रीय नेते होते.

 अटलजींसारख व्यक्तीमहत्व फक्त संघाच्याच कुशीत वाढू शकत याचे  बरेच उदाहरण देता येतील.लालकृष्ण आडवाणी ,मोदीजी सुषमा स्वराज,उमा भारती असे बरीच नावे सांगता येतील कि जी संघाच्या कुशीत वाढली आहेत.अटलजी म्हणजे संघाच्या वटवृक्षाचे सुमधुर फळ आहे.आख्खा  देश रडवणारा हा  दुसरा नेता आहे. बाळासाहेबही सबंध देश रडवून गेले होते.अशी माणसे कधी मरत नाहीत ती जीवंतच असतात त्यांच फक्त काळ  शरीर घेवून जातो तेही नायईलाजास्तव कारण नियतीचा तो नियमच आहे जो येतो  तो  जातोच.फक्त त्याची ती  अफाट किर्ती आपल्याजवळ ही  माणसे टाकून जातात. अटल जी प्रचारक होते आज हा प्रचारक न येण्याच्या प्रवासाला निघून  गेलाय.
आज अटल जींचा तो आवाज ती भाषण, 51 त्या कविता,अशा बर्याच आठवणी देवून देवाला हा देव भेटायला गेलाय. अटलजींची संपती  सांगयची म्हटली तर किर्ती कुणी म्हटलच आहे मरावे पण किर्ती रुपी उरावे. असा हा देव आज संपती घेवून नाही तर कुबेर लाही लाजवेल एवढी संपत्ती देवून गेलाय.देवच तो खुप  सारे आर्शीवाद देवून गेलाय.भाजपजवळ ह्या देवाची संपत्ती म्हणजे एक राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,पंतप्रधान ,लोकसभाध्यक्ष अशी अफाट संपत्ती भाजपला अटल जी देवून गेलेत.
भाजपात ज्यांनी कुणी प्रवेश केला असेल ती व्यक्ती  अटलजींकडे  बघून केला असेल.अटलजी म्हणजे विऱोधकानाही जिंकणार  व्यक्ती महत्व  होत.बर्याच पराभवांना अटलजींनी तोंड दिलय. तशी त्यांनी भविष्यवाणी ही केली होती.एक दिन कमल जरुर खिलेगा अस त्यांनी त्याच्या कवितेत म्हटल आहे.अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा,कमल खिलेगा’अटल जीनी कधी  सत्तेसाठी राजकारण केल नाही म्हणून ते एवढे मोठे होऊ  शकल.
अटलजी मरणालाही कधी  घाबरले नाहीत.कवीतेत ते  म्हणतात.

ठन गई!
मौत से ठन गई!


जूझने का मेरा इरादा न था,
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था,

रास्ता रोक कर वह खड़ी हो गई,
यों लगा ज़िन्दगी से बड़ी हो गई।

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं,
ज़िन्दगी सिलसिला, आज कल की नहीं।

मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ,
लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ?

अशी अटलजींची कविता ज्यात ते मरणाला भाव ही नाही देत. अटलजींनी मरणाचे वय पण आपल्या ह्या कवितेत सांगितले आहे.अटल जेव्हा जाणार होते तेव्हा त्यांनी जस भिष्माला ईच्छा मरण होत तस अटल जींना होत की काय अस  वाटायला लागत. कारण ते 15 आगस्टला नाही तर 16  तारखेला आपल्याला सोडून देवाच्या भेटीला गेले.अटलजींना पुन्हा सत्ता बघायची होती म्हणून का काय ते येवढी वर्ष आपल्यात होते.अटलजींनी यमालाही आपल्या कविता ऐकवल्या असतील जेव्हा  यमाने  शेवटची इच्छा विचारली असेल.अशा या  देवाला घेवून जाण्यासाठी यमही हात जोडून उभा होता.अटलजींनी जेव्हा स्वर्गात प्रवेश केला तेव्हा त्यांच स्वागत तर नक्कीच झाल असेल स्वर्गातील सर्वच  त्यांच्या स्वागतासाठी उभी असतील.लो.टिळकांपासून तर बाळासाहेब अब्दूल कलाम सारीच मंडळी उभी  असेल. यम देवासह इंद्रदेवानेही त्यांच्या स्वागताचा ठराव स्वर्गात मांडला असेल.आज स्वर्ग हसत आहे तर पृथ्वी रडत आहे

No comments:

Post a Comment