Monday, 31 December 2018

इस्राईली राजदूत यांची भेट



इस्राईली राजदूत यांची भेट इस्राईली राजदूत यांच्या भेटीच्या आठ दिवस अगोदर मला एका माझ्या मित्राने मित्र कसला ते आमचे गुरुच यांनी मी पुण्यात 3 तारखेच्या कार्यक्रमाला येणार आहे इस्राईली राजदूत यांचा तो कार्यक्रम आहे .पुणे युनिवर्सिटीत मुख्य इमारतीत कार्यक्रम होता. मी संपुर्ण आमंत्रण पत्रिका वाचली .पासेस शिवाय आत प्रवेश नाही मग काय कस जाव कार्यक्रमाला हाच प्रश्न गेली दोन दीवस सतावत होता मग विद्यापीठात मित्र होताच त्याला कॉल केला आणि त्याने तु फक्त ये त्या दिवसी मी पास काढून ठेवतो तुझ्या नावाचा मग मी निवांत झालो . एक पाऊल महत्वाचा पुढे सरकला होता कारण ज्युं राजदुत नाही तर माझ्या साठी मला महीसाच यहोवाच भेटणार होता . माझे मित्र गुरु मला भेटणार होते ज्यांनी मला आमंत्रण पत्रिका दिली होती. खास करुन आम्ही ह्या कार्यक्रमासाठी जळगाववरून आलो होतो. तसा तर माझा आणि त्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता फक्त भेट म्हणून मी कार्यक्रमाला जाणार होतो. शेवटी तो दिवस आला मला एक नव्हे दोन महत्वाचे व्यक्ती भेटणार होते. त्या दिवसाची गेली 3 ते 4 दिवस उत्सुक्ता होतीच मग तो दिवस त्या दिवसाचा पहीला सुर्य किरण डोळ्यावर पडला आणि सुर्य देवता ही माझ्याशी गोड हसली नक्कीच म्हटली असेल तु आज दोन महान व्यक्तिमहत्वांना भेटतोयेस जा तुझा आजचा दिवस अविस्मर्णीय होईल .मोतीबागेतुन दुपारी दोन वाजता निघालो विद्यापीठात मित्राने सांगितल्या प्रमाणे काम केलच होत .माझ प्रवेश पत्रक फोटो आयडी दाखवुन आत सभागृहाच्या आत प्रवेश केला आणि सुन्न झालो कारण काही सुचतच नव्हतं.थोडावेळ गप्प बसलो . डोळे मिटले अन शांत झालो .यशोहा मसीहा माझा प्रभु समोर दिसत होते . न भुतो न भविष्य असच मला त्या ठिकाणी गेल्यावर जाणवत होतं.एकदाचा कार्यक्रम सुरु झाला . ती झेड सिक्युरीटी सर्व दुर पोलिस कारण ती व्यक्ति साधीसुधी नव्हती तर 2000 वर्ष अथक परिश्रम करुन मिळालेल्या पुण्य भुमिचा राजदुत होती.ह्यातच मी माझ्या गुरुंना भेटलो . गडबडीत असल्यामुळे जास्त बोललो नाही अन सिक्युरिटीच कारण तेच कोणाशी बोलत नव्हते. राजदुत म्हटले भारताच्या मदतीसाठी भारतासारख्या मित्रासाठी कधीही कुठलीही मदत करायला तयार आहोत. इस्राईल हा देश भारताने केलेली मदत कधीच विसरलेला नाही.आजही माझ्या सारख्या सामान्य माणसाशी ज्यु व्यक्ती खुपच आपुलकिने बोलत असते त्यातच वाटत ज्यु लोक किती प्रेमळ असतात.विद्यापीठातील कार्यक्रम संपला आणि तो महत्वाचा क्षण आलाच माझी राजदुतांबरोबर भेट झाली अन फोटो काढला . मी त्याच्याशी समोर असून ही एक शब्द ही बोलू शकलो नाही गप्प अगदीच शांत माझ्या मित्राने माझ्या गुरुनी करुन दिलेली ही भेट माझ्यासाठी देवाला भेटण्यासारखीच होती.ह्या भेटीत मला इस्राईली पत्रकार लिओ याचीही भेट झाली .खर तर मी धऩ्य झालो कारण आपल्या किर्तीची जगालाही नोंद घ्यायला लावणार्या देशाच्या भारतातील राजदुताला भेटलो होतो.माझ्या मित्राची गुरुंची माझी भेट होणार होती. virendra sonawane

No comments:

Post a Comment