
अटलजींची ही कवीतेतील ओळ आठवली अन संघाच संचलन ही आठवलं .खर तर संघाच्या संचलनाविषयी ही हीच ओळ लागू पडेल.कदम मिलाकर चला होगा.संघाच संचलनही ह्या हिंदू समाजाला हीच गोष्ट सांगत आहे.संघटना जर मजबूत असेल तर त्या कडे कुणाची वाकडी पडूच शकत नाही.संघातील शिस्तीत चाललेल हे संचलन अहिंदूना धडकी भरवणारं असत. 2013 माझ पहीलं संचलन होतं मला जरा संचलनाविषयी माहीत नव्हत.एका शाखेत सप्टेबर महीन्यात दररोज संचलनाचा सराव व्हायचा. शिक्षक संचलन चुकलं कि नक्कीच ओरडायचे ,पण त्या वेळी फार एवढा विचारही केला नव्हता कि संचलनातून हिंदू समाजाला आदर्श अशी शिकवण मिळेल .अन खर तर संघाच्या सर्वच गोष्टीतून फार शिकण्या सारख आहे. संघ कधीच व्यक्ती निष्ट नाही . डॉक्टरांनीही भगव्या ध्वजालाच गुरु माना म्हणून सांगितल . संचलनाचा तो दिवस आला आणि सकाळीच 7 वाजता संचलन होतं . मी संपूर्ण गणवेश घालून रमनबागेत संचलनाला गेलो. स्वत: जेव्हा आपण संचलनात उभे असतो तेव्हाच संचलनाचा अर्थ कळतो. संघ गणवेश ह्या विषयी मी शिक्षकांना विचारलं होतं एका बौद्धीक वर्गात,सर्वाना एकच गणवेश म्हणजे संघातील पहील्याच दिवशी आलेली व्यक्ती असो कि 90 वर्षापासून संघात काम करणारी व्यक्ती सार्याना एकच गणवेश असतो. यातून समानताच समोर येते. सर्वच आपले बांधव आहेत हेच सिद्ध होतं .संचलन सूरु झालं अन 40 मिनिटांच हे संचलन इतक शिस्तीत झालं कि ते मला फार भावलं .प्रत्येक गल्लीतून गेल्यावर नागरिक संचलनातील स्वयंसेवकांचे स्वागत करत होते. फुलं ,फटाक्यांची ती आतषबाजी सारं वातावरण मनमोहून घेणारं होतं. संचलनाचे फोटोही समानता म्हणजे काय याची जणू व्याख्याच सांगून जातात. पण मनात एक खंत होती ही सारी मंडळी हे संघटन माझ्या पासून 22 वर्ष का लांब होतं किंवा माझ्या गावी हे संचलन माझ्या गावातील लोकांना चमत्कार का दिसू नये कारण गावी ह्या गोष्टी माहीतही नाही .एक संघटन आहे तेही हिंदू समाजाच अन एवढी शिस्त माझी फार ईच्छा आहे असल संघटन हे असलं संचलन माझ्याहगावातून ही व्हावं. खर तर मलाही ही संघ कसब्यात आल्यापासून समजला. आता पर्यंत संघ प्रसार माध्यमांतून कळत होता लोकांना अन लोकांपर्यत कसा पोहचत होता हे आपण जाणून आहात. असी परीस्थीती असेल तर संघाच काम अजून खूप बाकी आहे. गावाकडचा संघाविषयीचा किस्सा सांगतो . आजोबांना कळ वडीलांना कळलं मुलगा संघात आहे . पण काही गावातील असतातच खोचक त्यांनी काय कान भरवल काय माहीत दूसर्या दिवसी घरी खुप ओरडले . त्यांचही बरोबर आहे ,त्यांनी संघ जवळून बघीतलाच नव्हता.आज संघ घरी समजायला एवढी वर्ष लागली .असो आपल्या सार्यांना कदम मिलाकर चलना होगा हेच मात्र लक्षात ठेवाव लागेल.
No comments:
Post a Comment