Wednesday, 12 December 2018

मतदार राजा भाजप आणि काँग्रेस

king of voter
विश्लेषन बरीच वाचून झाली लोकशाही आहे,एक सरकार जाणार दुसरं येणार हे नक्की.फक्त भाजपचीच सत्ता  यावी असही नको व्हायला.जनतेला विकास हवा असतो जनतो ते बघत असते.देश सोशल मिडीया मुळे खुप हुशार झाला आहे.बरीच माहीत सामान्य माणसाला एक क्लिक वर मिळत आहे.तेव्हा जनता विकास मागते.निकालाच विश्लेषन झाल पण जनतेच्या मताच विश्लेषन कोण करेल.
     निवडणूक हारण्याचे बरीच कारण शोधली जातात.पण सध्याच्या सोशल मिडीया च्या युगात निवडणूकीत मत कुणाला द्या यावर बरीच चर्चा झालेली असते.अन मतदार पक्ष न बघता उमेदवाराला मत देतो.दुसरं एक बरीच वर्ष असणारी सत्ता जनता उलथवुन टाकते.जनता बाकी राजकरणाकडे मनोरंजनाने बघते तर मतदान करण्याच्या वेळेला बरोबर हवं तेच करते.आज बरीच सुशिक्षित तरुण पिढी उमेदवार कसा तो जनतेचा काम करेल का हेच बघत असते.
        पाचही राज्यांच्या निवडणूकीत भाजपचा दारुण पराभव जरी झाला असेल तरी त्याचा भविष्यात लोकसभा निवडणूकांवर काही परीणाम होईल असा विचार करऩ चुकीच ठरेल.2014 मध्ये भाजप जवळ किती राज्य होते आता किती आहेत यावरुनही आपण निष्कर्ष काढू शकतो.राज्याच्या निवडणूकीत अन देशाच्या निवडणूकीत फार फरक असतो.तरी भाजपची विजयी घोडदोड थांबली असली तरी यातून राहूल गांधींच नेतृत्व सिद्ध झाल अस म्हणू शकत नाही.कारण निवडणूक  निकालांची आकडेवारी पाहीली तर भाजप निसटत्या फरकाने हारलाय.नेतृत्वात अजून परीपक्वता असती तर पुर्ण बहूमत मिळालं असत. 2014 ते 2018 पर्यंत ज्याही निवडणूक झाल्या तिथे भाजप पुर्ण बहूमताने विजयी झालाय.त्रिपुरा सारख्या राज्यात तर एकही आमदार नसताना बहूमता निवडून येण फक्त मोदी आणि अमित शहाच ही जादू करू शकतात.अजून लोकसभेची निवडणूक आहे.  अन पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजप सह कॉंग्रसलाही घोषित करावा लागेल. शेतकर्यांकडेही विशेष लक्ष भाजपने द्याव.
       कर्नाटक,मध्यप्रदेश,राजस्थान यां राज्यांमध्ये भाजप निवडणूकीनंतर पुन्हा सत्तेवर येऊ शकतो. अशी आकडेवारीच सांगत आहे.तेव्हा मोदी शहांची रणनिती काय असेल हे पाहण्यासारखे असेल.मोदीं अन शहा यांची बरोबरी सध्यातरी राहूल होऊ शकत नाही. राहूल अजून बरीच मेहनत करावी लागेल.जनते समोर स्वत:ला सिद्ध कराव लागेल.पंतप्रधान उमेदवार होऩं सद्ध्यातरी तेवढ सोप नाही आहे.भाजप स्वबळावर जरी लढला तरी बहूमतापर्यंत येऊ शकतो.अन मोदींनी जनतेचा अजून विश्वास संपादन केलाच आहे. मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित असेच मुळीच झालेले नाही.बर्याच वर्षांची तपश्चर्येच फळ म्हणून पंतप्रधान उमेदवारी त्यानंतर पुर्ण बहूमतासह सरकार आणलय.पक्षाबरोबर मोदींची स्वत:ची कताकदही बरीच होते.आधी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वत: सिद्ध केलं तेव्हा त्यांना विरोधी पक्षातील मतपण मिळाली.लोक मोदींना जिंकवण्यासाठी विदेशातूनही आली आहेत. मोदींनी स्वत:च एक कँम्पन ही सुरु केलं होत. पण राहूल कडून हे सारं होणं तेवढस सोप नाही. कुण्या एका घराण्यामुळे ते पंतप्रधान होतील ते दिवस गेले आहेत आता नक्कीच नाही ते दिवस .बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परीस्थिती आहे. विकास दाखवा नाही तर मत नाही.राहूलला याच कसोठीवर उतराव लागणार  हे नक्की.

No comments:

Post a Comment