अहिराणी भाषा म्हटली म्हणजे खान्देश अन त्यात मुखत्वे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक असा एकूण खान्देश प्रदेश येतो.मराठी अन अहिराणी या दोन भाषांमध्ये बराच फरक आहे.खानपान,राहणीमान,बोलणे वगैरे बराच फरक आहे.बैलपोळा,आखाजी,खोपडी एकादशी, अश्या सणांची परंपरा खान्देशात आहे.
कष्टकरी खान्देशी शेतकऱ्यांच नवीन साल हे अक्षय तृतीया म्हणजे आखाजी पासून सुरु होत.घरात मृत झालेल्या व्यक्तीला स्मरण म्हणून डेरगं (मडकं )पण आखाजीला भरतात.सासुरवाशीण आखाजीची वाटपाहतच असते. "आखाजी दिवायी सव महिना महा उणी भाऊ म्हणा मले ल्हीई पयना"अशी म्हण खान्देशात प्रचलित आहे.
कष्टकरी खान्देशी शेतकऱ्यांच नवीन साल हे अक्षय तृतीया म्हणजे आखाजी पासून सुरु होत.घरात मृत झालेल्या व्यक्तीला स्मरण म्हणून डेरगं (मडकं )पण आखाजीला भरतात.सासुरवाशीण आखाजीची वाटपाहतच असते. "आखाजी दिवायी सव महिना महा उणी भाऊ म्हणा मले ल्हीई पयना"अशी म्हण खान्देशात प्रचलित आहे.
आखाजी म्हणजे अक्षय तृतीया हादिवस साडेतीन मुर्हुतापैकी एक . खाणदेशात ह्या दिवसाच महत्व खुप .आमच्या गावाकडे गेल्या कित्येक वर्षांपासुन रामलीला होते.संपूर्ण खांदशात ही परंपरा फक्त आमच्या गावी होते. या रामलीलेच विश्लषन करताना त्यातील बर्यागोष्टी सांगतोय.
पथनाट्यासारखा हाही एक प्रयोग.संपूर्ण नाटक म्हणजे 6 ते 8 तासांपर्यंत हा प्रयोग चालतो.रात्री 10वा.चालु झालेला प्रयोग सकाळीच 6 वाजता संपतो.थोडा अहिराणीत तर थोडा मराठी तेही खांदेशी मराठी मध्ये होतो.ह्याप्रयोगात संपूर्ण गावच सहभागी होते. तसेदोन दिवस म्हणजे तब्बल 16 तास हा प्रयोग वीणा कुठला खर्च गावाच्या वर्गणीत चालतो.संगीतही एकच विशिष्ट प्रकारच असत. संपूर्ण कथाही खुप वर्षांपूर्वी कुणीतरी गावकर्याने लिहीलेले अप्रतीम कथानक प्रयोग बघायला खेडोपाडी सर्वच बघायला येतात. आख्खी रामायण ह्यात पूर्ण केली गेलीय . नाटकाच्या मध्यांतरात काही काळ अहिराणीत बतावणी वगैरे सारखा एक प्रकार होतो. रावणाचे ते दहा तोंड ,शंकराचे वाहन नंदी बैल,ही पात्र साकार करणे खुपच कठीन कारण 20 ते 25 किलो वजन एक व्यक्ती उचलून त्यासह संवाद अन पावटी धरतो. रावणाच्या वधाच्या वेळेची ती शेरोशायरी अप्रतिम असते.
बर्याच नाटकाना पथनाट्यांना खुपच खर्च लागतो पण कमी खर्चात होणार हे नाटक एक वेगळच महत्व देऊन जातो.संपूर्ण वेषभुषाही गावातील व्यक्तीच करतात.
जे काही पात्र पेहराव मुखवते परीधान करतात त्याना सोंग म्हणतात. ह्यांना खुप भक्तीभावाऩे दहीभाताचा नैवद्य दिला जातो नंतरन संपूर्ण गावाला जेवण असते त्याचा प्रसाद म्हणून .वर्षांवर्षे चालत आलेली ही परंपरारा गावकर्यांचा श्रद्धेचा अन अस्तेचा विषय आहे.
कष्टकरी खान्देशी शेतकऱ्यांच नवीन साल हे अक्षय तृतीया म्हणजे आखाजी पासून सुरु होत.घरात मृत झालेल्या व्यक्तीला स्मरण म्हणून डेरगं (मडकं )पण आखाजीला भरतात.सासुरवाशीण आखाजीची वाटपाहतच असते. "आखाजी दिवायी सव महिना महा उणी भाऊ म्हणा मले ल्हीई पयना"अशी म्हण खान्देशात प्रचलित आहे.आखाजीतील उन्हामुळे जमीन पण पाण्यासाठी तहानलेली असते.आला पाऊस मातीच्या वासात गं मोती गुंफीत मोकळ्या केसांत"अस म्हणत गौरी गणपतीची स्थापना होते. सासुरवाशिणी लाकडाच्या गौरीची मनोभावे व्रत करतात.तशातच पावसाळा येतो.
मृगाच्या सरींनी शेत भिजून निघते. कष्ट करी शेतकरी पण आभासुन पाऊसाची वाट पाहताच असतो.पावसाच्या सरींनी शेतकरी पण सुखावतो.शेतकऱ्यांच्या कष्टाचा वाटेकरी असणारा प्राणी म्हणजे बैल.बैल पोळा म्हणजे शेतकऱ्याने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. यादिवशी पूर्ण विश्रांती बैलांना दिली जाते.सजवून त्यांना गोडधोड करून आई मारी च्या ग्राम दैवतांपर्यंत वाजत गाजत फिरवून आणलं जात.प्राण्यांप्रती भूतदया असणारा हा सण बैलपोळा.बैलपोळ्यानंतर गणरायाचे वाजत गाजत आगमन होते. अनंत चतुर्दशीच्या विसर्जननंतर कुमारिका गुलाबाईची स्थापना करतात. महिन्याभर गुलाबाईंचा मुक्काम असतो. दररोजचा गोडधोड खाऊ ती गीते.
नेहमीचे पारंपरिक सण खान्देशात अमाप उत्साहाने खान्देशी लोक साजरे करत असतात. परंतु काही वैशिष्ट्य पूर्ण सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.हे सण खान्देशातील संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत.खान्देशातील परंपराचालिरीतीचे दर्शन आपल्याला ह्या सणांमधून घडते. .खान्देशातील ग्रामदैवत कान्हबाई ,भालदेव,गौराई इत्यादी सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.कान्हबाईची स्थापना केली जाते.भाऊबंदकीतील सर्व एकत्र येतात. रोट आणि इतर पक्वान्नाचे जेवण करतात.कान्हबाईची मिरवनुक काढली जाते.अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो.
१९१६ साली बांधलेले तत्वज्ञान मंदिर अमळनेर येथे सुप्रसिद्ध आहे. काही पेशवेकालीन मंदिरही आहेत. अंबर वृषीची समाधी देखील अमळनेर येथे आहे. साने गुरुजींची कर्म भूमी अमळनेर तेथे आहे. सुरत लूट झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या अमळनेर मार्गानेच सुरतला गेले होते.सखाराम महाराजांच्या पालखी येथे प्रसिद्ध आहे. मे महिन्यात येथे यात्रा भरते. उत्तर मध्ययुगापासून परकोट होता. हे गाव धान्य आणि कापूससाठी प्रसिद्ध होते. इंग्रजांच्या काळात येथे व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला.उंदीरखेडे ता पारोळा येथे नजरदेव सुनपदेव अशी दोन गरम पाण्याची झरे आहेत. अश्व्तथामा विषयी कथा या गावाशी जोडल्या आहेत.कानाशी ता भडगाव येथे महानुभाव पंथीयांच्या कृष्णाची मंदिर आहेत.फरकांडे ता एरंडोल पासून १६ किमी अंतरावर हे गाव असून येथे हलत्या मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत.पाटणे वाघळी वाडगाव येथे यादवकालीन मंदिरे आहेत. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने धरणगाव पावन झाल आहे.
एरंडोल येथे पांडव काळातील एक चक्र नगरी काही काळ पांडवांचे वास्तव्य होते.पद्मालय येथे भीमकुंड प्रसिद्ध आहे.पद्मालय गणपतीचे जागृत देवस्थान आहे.धुळे येथे अशमयुगीन वसाहती आढळल्या आहेत. एकविरामाता हि येथील ग्रामदेवता.पिपळनेर येथे ८ शतकापासूनचे अवशेष येथे सापडले आहेत.
अशा पद्धतीने खान्देश हा मध्ययुगीन अन यादवकालीन साठी प्रसिद्ध आहे. त्यानुसारच खान्देशात अहिराणी चित्रपट सुद्धा खान्देशात प्रसिद्ध आहेत. बी कुमार यांनी अहिराणी चित्रपट तयार केले खान्देशात ते खूप प्रसिद्ध आहेत. मागल्या वर्षीच त्यांना देवाज्ञा झाली.महामहिम राष्ट्रपती याही खांदेशातीलच आहेत.बहिणाबाई चौधरी यांच्या विषयी काही लिहिण्याची गरजच नाही. बहिणाबाही हा असंकाही चमत्कार खान्देशातील आहे कि अडाणी असूनही काही लिहिता वाचता येत नसूनही संपूर्ण आयुष्यातील अनुभव त्यांनी कवितेच्या माध्यमातून प्रकट केले आहेत.
गिरणा तापी वाघूर या नद्यांनी समृद्ध प्रदेश म्हणजे खान्देश.प्राचीन काळापासून वैशिठ्य पूर्ण खांदेश खांडववन, ऋषिक, दानदेश, स्कंददेश, कान्हदेश (खान्देश) अशा बऱ्याच नावांनी ओळखला जातो.ठसकेबाज अशी अहिराणी कष्टाळू शेतकरी तसेच झणझनीत शेवभाजी व वांग्याच भरीत अशी खाद्यसंस्कृती असलेला खान्देश.
वांग्याचं भरीत अन शेवभाजी म्हणजे खान्देश असा समीकरणच बनून गेलय.जसे पुणे म्हटलं की, जोशींचे वडे आठवतात. त्याप्रमाणे खान्देश म्हटलं की, वांग्याच्या भरीताने तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. खान्देशी भरताची चव लय भारी असल्याने खान्देशातल्या वांग्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून तर मागणी आहेच; परंतु आता इतर राज्यांतही ही वांगी आवडीने खाल्ली जातात.पुण्यातील खान्देश जंकशन म्हणून एक सदाशिव पेठेतील हॉटेल आहे. तिथे वांग्याचं झणझणीत भरीत,वरण बट्टी,पातोळ्यांची भाजी अशा बऱ्याच पदार्थ खाण्यासाठी रांगाच लागतात.
वांग्याचं भरीत अन शेवभाजी म्हणजे खान्देश असा समीकरणच बनून गेलय.जसे पुणे म्हटलं की, जोशींचे वडे आठवतात. त्याप्रमाणे खान्देश म्हटलं की, वांग्याच्या भरीताने तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. खान्देशी भरताची चव लय भारी असल्याने खान्देशातल्या वांग्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून तर मागणी आहेच; परंतु आता इतर राज्यांतही ही वांगी आवडीने खाल्ली जातात.पुण्यातील खान्देश जंकशन म्हणून एक सदाशिव पेठेतील हॉटेल आहे. तिथे वांग्याचं झणझणीत भरीत,वरण बट्टी,पातोळ्यांची भाजी अशा बऱ्याच पदार्थ खाण्यासाठी रांगाच लागतात.
विरेंद्र सोनवणे
माहिती संकलन
अनाजधुन
माहिती संकलन
अनाजधुन

No comments:
Post a Comment