Monday, 31 December 2018

कदम मिलाकर चलना होगा





अटलजींची ही कवीतेतील ओळ आठवली अन संघाच संचलन ही आठवलं .खर तर संघाच्या संचलनाविषयी ही हीच ओळ लागू पडेल.कदम मिलाकर चला होगा.संघाच संचलनही ह्या हिंदू समाजाला हीच गोष्ट सांगत आहे.संघटना जर मजबूत असेल तर त्या कडे कुणाची वाकडी पडूच शकत नाही.संघातील शिस्तीत चाललेल हे संचलन अहिंदूना धडकी भरवणारं असत. 2013 माझ पहीलं संचलन होतं मला जरा संचलनाविषयी माहीत नव्हत.एका शाखेत सप्टेबर महीन्यात दररोज संचलनाचा सराव व्हायचा. शिक्षक संचलन चुकलं कि नक्कीच ओरडायचे ,पण त्या वेळी फार एवढा विचारही केला नव्हता कि संचलनातून हिंदू समाजाला आदर्श अशी शिकवण मिळेल .अन खर तर संघाच्या सर्वच गोष्टीतून फार शिकण्या सारख आहे. संघ कधीच व्यक्ती निष्ट नाही . डॉक्टरांनीही भगव्या ध्वजालाच गुरु माना म्हणून सांगितल . संचलनाचा तो दिवस आला आणि सकाळीच 7 वाजता संचलन होतं . मी संपूर्ण गणवेश घालून रमनबागेत संचलनाला गेलो. स्वत: जेव्हा आपण संचलनात उभे असतो तेव्हाच संचलनाचा अर्थ कळतो. संघ गणवेश ह्या विषयी मी शिक्षकांना विचारलं होतं एका बौद्धीक वर्गात,सर्वाना एकच गणवेश म्हणजे संघातील पहील्याच दिवशी आलेली व्यक्ती असो कि 90 वर्षापासून संघात काम करणारी व्यक्ती सार्याना एकच गणवेश असतो. यातून समानताच समोर येते. सर्वच आपले बांधव आहेत हेच सिद्ध होतं .संचलन सूरु झालं अन 40 मिनिटांच हे संचलन इतक शिस्तीत झालं कि ते मला फार भावलं .प्रत्येक गल्लीतून गेल्यावर नागरिक संचलनातील स्वयंसेवकांचे स्वागत करत होते. फुलं ,फटाक्यांची ती आतषबाजी सारं वातावरण मनमोहून घेणारं होतं. संचलनाचे फोटोही समानता म्हणजे काय याची जणू व्याख्याच सांगून जातात. पण मनात एक खंत होती ही सारी मंडळी हे संघटन माझ्या पासून 22 वर्ष का लांब होतं किंवा माझ्या गावी हे संचलन माझ्या गावातील लोकांना चमत्कार का दिसू नये कारण गावी ह्या गोष्टी माहीतही नाही .एक संघटन आहे तेही हिंदू समाजाच अन एवढी शिस्त माझी फार ईच्छा आहे असल संघटन हे असलं संचलन माझ्याहगावातून ही व्हावं. खर तर मलाही ही संघ कसब्यात आल्यापासून समजला. आता पर्यंत संघ प्रसार माध्यमांतून कळत होता लोकांना अन लोकांपर्यत कसा पोहचत होता हे आपण जाणून आहात. असी परीस्थीती असेल तर संघाच काम अजून खूप बाकी आहे. गावाकडचा संघाविषयीचा किस्सा सांगतो . आजोबांना कळ वडीलांना कळलं मुलगा संघात आहे . पण काही गावातील असतातच खोचक त्यांनी काय कान भरवल काय माहीत दूसर्या दिवसी घरी खुप ओरडले . त्यांचही बरोबर आहे ,त्यांनी संघ जवळून बघीतलाच नव्हता.आज संघ घरी समजायला एवढी वर्ष लागली .असो आपल्या सार्यांना कदम मिलाकर चलना होगा हेच मात्र लक्षात ठेवाव लागेल.

इस्राईली राजदूत यांची भेट



इस्राईली राजदूत यांची भेट इस्राईली राजदूत यांच्या भेटीच्या आठ दिवस अगोदर मला एका माझ्या मित्राने मित्र कसला ते आमचे गुरुच यांनी मी पुण्यात 3 तारखेच्या कार्यक्रमाला येणार आहे इस्राईली राजदूत यांचा तो कार्यक्रम आहे .पुणे युनिवर्सिटीत मुख्य इमारतीत कार्यक्रम होता. मी संपुर्ण आमंत्रण पत्रिका वाचली .पासेस शिवाय आत प्रवेश नाही मग काय कस जाव कार्यक्रमाला हाच प्रश्न गेली दोन दीवस सतावत होता मग विद्यापीठात मित्र होताच त्याला कॉल केला आणि त्याने तु फक्त ये त्या दिवसी मी पास काढून ठेवतो तुझ्या नावाचा मग मी निवांत झालो . एक पाऊल महत्वाचा पुढे सरकला होता कारण ज्युं राजदुत नाही तर माझ्या साठी मला महीसाच यहोवाच भेटणार होता . माझे मित्र गुरु मला भेटणार होते ज्यांनी मला आमंत्रण पत्रिका दिली होती. खास करुन आम्ही ह्या कार्यक्रमासाठी जळगाववरून आलो होतो. तसा तर माझा आणि त्या कार्यक्रमाशी काहीही संबंध नव्हता फक्त भेट म्हणून मी कार्यक्रमाला जाणार होतो. शेवटी तो दिवस आला मला एक नव्हे दोन महत्वाचे व्यक्ती भेटणार होते. त्या दिवसाची गेली 3 ते 4 दिवस उत्सुक्ता होतीच मग तो दिवस त्या दिवसाचा पहीला सुर्य किरण डोळ्यावर पडला आणि सुर्य देवता ही माझ्याशी गोड हसली नक्कीच म्हटली असेल तु आज दोन महान व्यक्तिमहत्वांना भेटतोयेस जा तुझा आजचा दिवस अविस्मर्णीय होईल .मोतीबागेतुन दुपारी दोन वाजता निघालो विद्यापीठात मित्राने सांगितल्या प्रमाणे काम केलच होत .माझ प्रवेश पत्रक फोटो आयडी दाखवुन आत सभागृहाच्या आत प्रवेश केला आणि सुन्न झालो कारण काही सुचतच नव्हतं.थोडावेळ गप्प बसलो . डोळे मिटले अन शांत झालो .यशोहा मसीहा माझा प्रभु समोर दिसत होते . न भुतो न भविष्य असच मला त्या ठिकाणी गेल्यावर जाणवत होतं.एकदाचा कार्यक्रम सुरु झाला . ती झेड सिक्युरीटी सर्व दुर पोलिस कारण ती व्यक्ति साधीसुधी नव्हती तर 2000 वर्ष अथक परिश्रम करुन मिळालेल्या पुण्य भुमिचा राजदुत होती.ह्यातच मी माझ्या गुरुंना भेटलो . गडबडीत असल्यामुळे जास्त बोललो नाही अन सिक्युरिटीच कारण तेच कोणाशी बोलत नव्हते. राजदुत म्हटले भारताच्या मदतीसाठी भारतासारख्या मित्रासाठी कधीही कुठलीही मदत करायला तयार आहोत. इस्राईल हा देश भारताने केलेली मदत कधीच विसरलेला नाही.आजही माझ्या सारख्या सामान्य माणसाशी ज्यु व्यक्ती खुपच आपुलकिने बोलत असते त्यातच वाटत ज्यु लोक किती प्रेमळ असतात.विद्यापीठातील कार्यक्रम संपला आणि तो महत्वाचा क्षण आलाच माझी राजदुतांबरोबर भेट झाली अन फोटो काढला . मी त्याच्याशी समोर असून ही एक शब्द ही बोलू शकलो नाही गप्प अगदीच शांत माझ्या मित्राने माझ्या गुरुनी करुन दिलेली ही भेट माझ्यासाठी देवाला भेटण्यासारखीच होती.ह्या भेटीत मला इस्राईली पत्रकार लिओ याचीही भेट झाली .खर तर मी धऩ्य झालो कारण आपल्या किर्तीची जगालाही नोंद घ्यायला लावणार्या देशाच्या भारतातील राजदुताला भेटलो होतो.माझ्या मित्राची गुरुंची माझी भेट होणार होती. virendra sonawane

Friday, 21 December 2018

राफाएलची कोटिच्याकोटी उड्डाणे


राफेल विमान व्यवहार प्रकरणी राजकीय आरोपप्रत्यारोपांची विमाने हवेतच उडत.सरकारला कस कोंडीत पकडायचं याचाच विचार विरोधक करत आहेत.सत्ताधारी आम्हीच खरे आहोत जनतेला सांगत आहे.न्यायालयात जरी सरकार बरोबर असल तरी जनतेच्या न्यायालयात अजून सरकार योग्य हे सिद्ध व्हायचंय. जनतेला कोण बरोबर हे मात्र अजून समजलेला नाही. कारण मीडिया पण सरकार कस चूक हेच दाखवत आहे.नक्की कोण खर बघणं गरजेचं आहे.राफेल व्यवहार अजून संसदेतहि आला नाही तोपर्यंत व्यवहारातील किमती यांना कशा समजल्या. न्यायालयाने क्लीन चिट जरी दिली तरी त्यानंतरच्या घडामोडी घडल्या आहेत.टायपिंगच्या चुका नक्की कुणी केल्या यावर हि प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. एकूण साऱ्या घडामोडी बघता नाट्यमय घडमोडिच सध्या सुरु आहेत.संरक्षण विषयक व्यवहार कसा होतो?लोकलेखा समितीच नक्की कार्य काय?कुठल्या बाबींवर लोकलेखा समिती हस्तक्षेप करू शकते.सरकार कॅगला कुठल्या बाबी देऊ शकत.?ह्या व्यतिरिक्त अजून काही बाबी पडताळून पाहण्याची गरज आहे.राजीवजी हे कॅगचे प्रमुख असून ते कुठल्या बाबीवर अहवाल बनवू शकतात ?संयुक्त संसदीय समितीच कार्य काय ?ह्या साऱ्या गोष्टी जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे. संसदीय कामकाजानुसार सरकार काम करत आहे का?मल्लिकार्जुन खर्गे यांना लोकलेखा समितीची जबाबदारी आहे. अन ते आपल्या हक्काची अशी राजकीय स्वार्थासाठी उपयोग करून सरकारला वेठीस धरू शकत नाही. कॅगची कार्य आणि उघड केलेला भ्रष्टाचार स्थानिक संस्था आणि प्राधिकरण यांना विशिष्ट हेतू साठी दिले जाणारे कर्ज यावर हि कॅगच नियंत्रण असत. सर्व सरकारी खात्यांची लेखापरीक्षा कॅगला सोपवली जाते.त्यावर कॅग लेखापरीक्षण करून कॅग निर्णय देते. सध्याचे कॅगचे अध्यक्ष राजीव मेहरीशी हे आहेत.राज्य सरकार केंद्र सरकार यांची देशांतर्गत किंवा देशाबाहेरील सर्व व्यवहारांचे नियंत्रण कॅगवर असते.२ जी स्पेक्ट्रम मध्ये पण परवाना देण्यावर कॅगच्या अहवालावर मोठा वाद झाला. १७८६ अब्ज अमेरिकन डॉलरचा घोटाळा यामुळेच उघडकीस आला.सिबीआयने २ एप्रिल २०११ ला दाखल केलेल्या आरोप पत्रात ३१० अब्ज अमेरिकन डॉलर गमावले.२ फेब्रुवारी २०१२ ला न्यायालयाने जनहित याचिका(पीआयएल )ने २ जी स्पेक्ट्रम ची वाटणी असैवैधानिक ठरवली. सर्व आरोप निश्चित करत सर्व १२२ परवाने जारी केलेल्या सर्व खटल्यांना नकार दिला. लोकलेखा समितीची कार्य भारतात संसदीय लोकशाही आहे.लोक लेखा समिती (पीएसी) सरकारची आर्थिक तपासणीस संसदेस मदत करते. लोक लेखा समिती (पीएसी) हा नियंत्रक महालेखापरीक्षक (कॅग) यांनी सादर केलेल्या वार्षिक लेखापरीक्षा अहवालांचे परीक्षण करण्यासाठी दरवर्षी एक वित्तीय समिती बनविली जाते आणि संसदेत त्याचे शोध अहवाल पाठवते .पीएसी संसदेने त्याच्या सदस्यांमधून अनुप्रमाणित प्रतिनिधित्वाद्वारे निवडली आहे. एकाच हस्तांतरणीय मतानुसार. मंत्री पीएसीचे सदस्य होऊ शकत नाहीत. अध्यक्ष सत्ताधारी पक्षाचा असू शकत नाही. निवडणुकीची ही रचना आणि पध्दत पीएसी समावेशास पात्र आहे आणि त्यास वैधता प्रदान करते. पीएसी पब्लिक पर्सच्या देखरेखीखाली काम करते (ए) विनियोग खाते आणि वित्त खात्यावरील लेखापरीक्षा अहवाल तपासणे. (बी) विनियोग खाते सत्यापित करण्यासाठी पडताळणी करणे. कॅग पीएसीला मार्गदर्शक मित्र म्हणून काम करते .पीएसी केवळ कायदेशीर वैधता आणि खर्चासाठीच नव्हे तर कचरा, तोटा, भ्रष्टाचार, अनावश्यकता आणि अक्षमतेची काळजी घेते. पीएसीच्या कार्यकाळात कधीकधी टीका केली गेली कारण ती पॉलिसीच्या पैलूकडे लक्ष देत नाही आणि केवळ शिफारस केली जात आहे. कॅगचा अहवाल लोकलेखा समितीला देणे राज्यसभेच्या बाबतीत राज्यसभेत राष्ट्रपती व राज्यपालांच्या बाबतीत कॅगच्या अहवालास राष्ट्रपतींकडे सादर केले जाते आणि त्यास सदनिकासमोर सादर केले जाऊ शकते. एकदा सदनमध्ये सादर केले की, अहवाल सार्वजनिक पब्लिक अंडरटेकिंग्ज (सीओपीयू) वर सार्वजनिक खाती (पीएसी) / समित्यांवर केंद्रीय आणि राज्य स्थायी समित्यांकडे कायमस्वरुपी संदर्भित केले जातात. वार्षिक खाती वेळेवर आणि सखोल तपासणी आणि त्यावर लेखापरीक्षा अहवाल सुलभ करण्यासाठी या विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. समित्या कॅगच्या अहवालातून त्या निष्कर्षांची आणि शिफारशींची निवड करतात आणि त्यांच्यावरील सुनावणीची व्यवस्था करतात. कॅग या कार्यात समित्यांना तांत्रिक सहाय्य प्रदान करतो. त्यांच्या परीक्षणाच्या आधारे समित्या समितीच्या सुनावणीचे सारांश, कार्यकारी समितीकडून घेतलेल्या कारवाईचा सारांश आणि प्रशासकीय पद्धती आणि प्रक्रियांमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसींचा समावेश करून संसदमध्ये पाठवला जातो. संसदेत आणि राज्य विधानमंडळात सादर केलेल्या कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांमध्ये महसूल गोळा करणे आणि सरकारी खर्च लेखापरीक्षा अहवालांचा समावेश आहे ज्याद्वारे कायद्यानुसार प्रदान केलेल्या काही स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर सरकारी, स्वतंत्र लेखापरीक्षा अहवाल, केंद्रीय आर्थिक स्थितीवर अहवाल आणि राज्य सरकार आणि संसदेत आणि विधानमंडळांनी मंजूर केलेल्या कायद्यांचे पालन करण्याच्या अहवाल. कॅग राज्य विधानमंडळांना अर्थ व मान्यता खात्याच्या नावाने ओळखले जाणारे राज्य प्रमाणित वार्षिक खाते देखील सादर करते. राफेल करार कधी झाला , राफेलची वैशिष्ठे :

वायू सेनेला लढाऊ विमानाची गरज होती. वाजपेयी सरकारने १२६ विमान घेण्याचा प्रस्ताव ठेवला. वाजपेयी सरकार पासून राफेल करार सुरुवात झाली.पण ह्या प्रस्तावाला काँग्रेसने पुढे नेला आणि एके अँटोनी यांनी रक्षा परिषदेच्या प्रस्तावाला ऑगस्ट २००७ मध्ये मंजुरी दिली.येथून पुढे ह्या प्रस्तावच्या बोलिला सुरुवात झाली.राफेल हा चार देशांच्या कंपनीमधून निवडला गेला. अमेरिका ,फ्रान्स ,रुस ,ब्रिटन यादेशांतील कंपन्या यात शामिल होत्या.राफेल खासियत अशी आहे हवेतल्या हवेत मारा करणे, अण्वस्त्र हल्ल्यापासुंन संरक्षण करणे, लक्षच बरोबर मारा टिपणे अन इतर देशांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे.देखभालीचा पण खूपच कमी खर्च येतो.बऱ्याच कारणांमुळे हा प्रस्ताव अटकून होता.आणि युपीएच्या काळात हा समझोता होऊ शकला नाही.१०८ विमानाची जबाबदारी देसाल्ट एव्हिएशन घेणार नव्हती.देसाल्टच म्हणणं होत कि ३८ मजुरांची गरज होती ,पण हॉलने याच्या कैकपट जास्त तास सांगितले.याकारणामुळे समझोता झाला नाही.पुढे २०१५ मध्ये मोदी फ्रान्स च्या दौऱ्यावर गेले असता त्यांनी ३६ विमान घेण्यावर करार झाला.फ्रान्स सहमती दाखवली.समझोता झाल्यापासून फ्रान्स १८ महिन्यांनी त्याची पूर्तता होईल. फ्रान्स सिनेटने जारी केलेल्या किमंती:- ५९००० करोड रुपयांचा हा करार झाला असा प्रसार माध्यमांकडून जरी समजलं असल प्रत्येक्षात करारावर किती खर्च झालाय हे अजून सरकारने घोषित केलेल नाही.कोर्टानेही यावर खरी किमंत सांगायला नकार दिला आहे.इतर शत्रू देशांना याविषयी माहिती मिळेल असा कोर्टाकडून सांगण्यात आलाय.कॅगच्या अहवाल अजून मिळालेला नाही. खरी प्रक्रिया शासन व्यवस्थित पार पाडत आहे. फ्रान्सने जाहीर केलेल्या किमती नुसार राफेल सी ची किंमत ५२७ कोटी रुपये आहे. तर राफेल एमची किमंत ६०५ कोटी रुपये आहे.राफेल बी ची किमंत ५६६ कोटी रुपये आहे.राफेलची किमंत फ्रेंचच्या २०१३ नुसार डिझाईन,चाचणी, फ्रेंच वायुदल बांधण्याचा खर्च, इतर खर्च ४५ अब्ज येवडा खर्च आहे. सर्व आकडेवारी हि फ्रेंच सिनेट ची आहे.उत्पादन खर्च , डिझाईन खर्च, देखरेख खर्च असा खर्च एकूण खर्च १२२५ प्रति राफेल आहे. कोर्टाचा निकाल आणि त्यावरील वाद : गोपनीय करार असल्यामुळे कोर्टाने निकाल देताना सांगितलं कि कोर्ट राफेल करारातील विमानची खरेदी किमंत सांगू शकत नाही.हे प्रकरण राष्ट्र हित आणि संरक्षण तज्ज्ञांचं प्रकरण आहे.प्रसार माध्यमांच्या माहितीवरून याचिका दाखल झाली आहे.हे प्रकरण न्यायालय हाताळन्यास सक्षम आहे का ?असा ऍटर्नी जनरल यांनी सांगितले.१९८५ पासून भारताजवळ एकही जेट विमान नाही. भाजप सरकारनेही हे प्रकरण स्वतःहून अंगाशी ओढऊन घेतलं दिसत आहे. कारण काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर यावा असच भाजपला वाटत आहे.एकीकडे काँग्रेस निकालानंतर पत्रकार परिषद घेऊन निकालातील खोटे पण समोर आणत आहे. पण खरंतर पत्रकार परिषद घेऊन जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा सरळ कोर्टात जाऊन का नाही याचिका दाखल केली जात.कोर्टानेही निकाल देताना सर्व बाबी पडताळूनच निकाल दिला आहे.कारण कोर्टाने संबंधीत अधिकाऱ्यांना कोर्टात बोलावलं होत.अजूनही प्रकरण जरी सरकार कडूंन गुलदस्त्यात असल तरी सरकार कोर्टची फसवणूक करू शकत नाही. कारण कोर्टची फसवणुकीची सरकारसंबंधित लोकांना काय शिक्षा होऊ शकते याची जाणीव नक्की असेल.कारण भविष्यात याविषयी बऱ्याच गोष्टी समोर येतीलच. सत्य बाहेर येईलच जेव्हा कॅगला अहवाल मिळेल. त्यांनंतर त्यावर लेखापरीक्षण होईल अन तो अहवाल कीमतींसह लोकलेखासमिती सामोरं ठेवण्यात येईल.
"The material placed before us shows that the Government has not disclosed pricing details, other than the basic price of the aircraft, even to the Parliament, on the ground that sensitivity of pricing details could affect national security, apart from breaching the agreement between the two countries. The pricing details have, however, been shared with the Comptroller and Auditor General (hereinafter referred to as “CAG”), and the report of the CAG has been examined by the Public Accounts Committee (hereafter referred to as “PAC”). Only a redacted portion of the report was placed before the Parliament, and is in public domain. "
ह्या सर्वोच्च न्यायालयाचं जजमेन्ट आहे. ह्या कोर्टने म्हटलंय कि किमतीचे तपशील महालेखापरीक्षक आणि नियंत्रक यांच्या कडून सामायिक केलेगेले आहेत.अन लोकलेखा समितीने ते तपासले आहेत.अस संपूर्ण जजमेन्ट कोर्टाने दिले आहे. ह्या परिषेद २५ वरून वाद निर्माण झालाय.कारण कोर्टाने म्हटल्या प्रमाणे अस काहीच झालेलं नाही. कारण कॅग पर्यंत अहवाल पोहोचलाच नाही. मग तो लोकलेखा समिती पर्यंत पोहण्याचा संबंधच नाही. सरकारने यावर याचिका दाखल केलीय.खर बघता सरकार कडून चूक झाली कि कोर्टाकडून हे तर समजणार नाही कारण दिलेला अहवालच सार्वजनिक नाही. ह्याबाबत आता जनतेला कोर्टनेच सांगायचंय कि नेमकी चूक कुणाची. नक्की काँग्रेसचे हि बरेच घोटाळे समोर आले आहेत , एका बाजूला राहुल अन सोनिया नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी जामिनावर आहेत. अन हेच मोदी सरकारने घोटाळा केला म्हणून सांगत आहेत.जनतेला न्यायालयानेच सांगितलं कि ह्यात काही घोटाळा नाही पण जनतेची दिशाभूल व्हावी ह्या उद्धिष्टने सरकारला घेरलं जात आहे.याचे पडसाद नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीत पाडतील यात काळी मात्र शंका नाही.
माहिती संकलन विकिपीडिया सर्वोच्च न्यायालय निकाल २५ परिच्छेद
https://en.wikipedia.org/wiki/Rafale_deal_controversy https://www.rediff.com/news/special/has-india-paid-more-for-the-rafales/20171201.htm

Monday, 17 December 2018

शेती आणि पर्यटनावर आधारित अलुमिम किब्बुत्झ

israel
mobile shoe movie


अलुमिम नावाचा अर्थ हिब्रूमध्ये युवा असा होतो.दक्षिण इस्राईलच्या वायव्य भागात नेव्हेव वाळवंटात गाझा पट्टीजवळ अलुमिम हे किब्बुत्झ आहे.
सँडोत नेव्हेव प्रादेशिक परिषेदेच्या अधिकार क्षेत्रात येते.अलुमिम किब्बुट्झमध्ये ४८७ लोक राहतात. त्यामध्ये १३५ मुले तर एकूण ९० कुटुंब एकत्र राहतात.यामध्ये वर्गवारी केली तर किब्बुत्झ सदस्य, सैनिक, विद्यार्थी,म्हातारे असा समावेश होतो.किब्बुत्झ सदस्य सैन्यात भरती होण्याअगोदर नौकरी करणे,शिकणे शेती विषयक प्रशिक्षण घेणे  सुनियोजन करून यासाऱ्या गोष्टी करणे.इतर देशाचेही सदस्य किब्बुत्झ मध्ये असतात.
  अलुमिम एक पारंपरिक किब्बुत्झ आहे.किब्बुत्झ मध्ये सर्व सदस्यांचे उत्पन्न अलुमिम किब्बुत्झच्या विविध शाखांचे उत्पन्न सारे किब्बुत्झच्या केंद्रीय खात्यात जमा केले जाते.अलुमिमचे कुठलेही खाजगीकरण झालेले नाही. अलुमिम किब्बुत्झचे नियोजन किब्बुत्झच्या सर्व समित्यांद्वारे केले जाते.
   अल्युमिम एक यशस्वी किबूतत्झ आहे ज्यांचे अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे.अलुमिम किब्बुत्झमध्ये इतर उद्योगांचाहि विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे.अलुमिम किब्बुत्झव्दारे इतर नागरिकांना प्रशिक्षण दिले जाते.अलुमिम किब्बुत्झमध्ये ४०० नागरिक आपलं जीवन जगत आहेत.
अलुमिममध्ये समावेश असलेली पिके
* शेती: वाढत्या बटाटे, गाजर, गोड बटाटे, (पारंपरिक आणि ऑर्गेनिक) मिरची, जॉझ्गा, गहू आणि इतर अन्नधान्य पिके 
* कुक्कुटपालन: मांस साठी कोंबडी बदलता
* दुग्धव्यवसाय: दुधासाठी गायी तयार करणे
* भाजीपाला भरन्याचे केंद्र:- शेंद्रीय पिकांचे वर्गीकरण करून ती व्यवस्थित भरणे.
* Alutech: इस्रायल आणि परदेशात संगणकीकरण आणि नियंत्रण प्रकल्पांची रचना आणि अंमलबजावणी करण्यासाठी संगणक ऑटोमेशन           टेक्नॉलॉजीचा वापर करणे.
* अतिथी गृह: आधुनिक धार्मिक कुटुंबातील वातावरणानुसार वर्षभर कार्यरत राहतात
* गॅरेज: सर्व्हिंग कार आणि ट्रॅक्टर
* दंत चिकित्सालय: अद्ययावत परिसरात उच्च दर्जाचे उपचार प्रदान करणे
* बाहेरील रोजगार आणि उद्योजक : त्यांच्या व्यवसायात कारकीर्द बजावण्यासाठी आणि वैयक्तिक व्यवसाय करणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदस्यांना सक्षम करणे.
*अलुमिम मध्ये साप्ताहिक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या केंद्रांना बेनेट नेसेट आणि बॅट मिंदीरश अस म्हटलं जात.यामध्ये सभा , उत्सव दैनंदिन कार्यक्रम हि घेतले जातात.इतर सदस्यांबरोबर आपुलकीचे संबध प्रस्तापित व्हावेत यासाठी एकत्रीकरण होते.
किबुत्झ अलुमिम त्सेदाका (धर्मादाय) आणि सामाजिक जागरुकता यावर खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. एक समुदाय म्हणून आणि वैयक्तिकरित्या अलुमिमचे रहिवासी असंख्य स्वैच्छिक प्रकल्पांमध्ये गुंतलेले आहेत
अलुमिममध्ये उन्हाळी शिबीर होतात. खास करून हि शिबीर अंध मुलांसाठी आयोजित केलेली असतात.
अलुमिमच्या शोकाकूल कुटुंबीयांची भेट घेणे, एकमेकांच्या दुःखात सहभागी होणे,कर्करोगाच्या रुग्णांना मदत करणे.
अलुमिमच्या प्रगतीसाठी केलेल्या उपाय योजना
सदस्यांना प्रशिक्षण,
वृद्धांसाठी कल्याणासाठी तरतूद
* सदस्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समृद्ध करण्यासाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा विकास
* संपूर्ण समुदायातील आणि संपूर्ण इझरायली समाजात सामाजिक कल्याण कार्यक्रमांचे सहभाग आणि परस्पर सहमती
* गाझा बॉर्डरवर समृद्ध वाढलेल्या समूहातील सुरक्षेचा आणि आव्हानाला तोंड देण्यासाठी सतत गुंतवणूक
वरील सर्व माहिती वेगवेगळ्या वेब साईट वरील आहे. खास करून हिब्रू भाषेतील भाषांतर आहे.भारतातून पण काही नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन अलुमिम असेल किंवा इतर २७० किब्बुत्झ असतील त्यांना भीती द्यायला हव्यात.इस्राईल सारखा मित्र देश भारताला नेहमीच मदद करतो. इस्राईल भारतीय शेतकऱ्यांना नेहमीच प्रशिक्षण द्यायला तयार आहे.भारत सरकारने इस्राईलमधील शेतीविषयक तंत्रज्ञान शेतकऱ्याला कस स्वस्थात मिळेल याकडे बघितलं पाहिजे.
धन्यवाद. जय इस्राईल जय भारत

Friday, 14 December 2018

सोशल मिडीया आणि सेल्फी


सोशल मिडीयावर लाईक मिळवण्याच्या नादात कुठेतरी कसरती करुन सेल्फी काढले जातात.सर्वच वयोगटात हे सारं चाललेलं असत. त्या नादात काही आपला जिवही गमवतात.काय गरज आहे एवढी मेहनत करायची. 
           सेल्फी काढा पण त्यालाही काही नियम लावले पाहीत .जिथे पाहताच येणार नाही अशा अडचणीच्या अन निसर्ग रम्य ठिकाणी सेल्फी काढला जातो.असो कार्टानेही सहलीला जाताना सेल्फीला बंदी केली आहे अन ते योग्यच आहे सेल्फीच बरच फँड आहेच. तसच राजकारणी लोक ही सेल्फी कशाकशा बरोबर घेतील सांगता येत नाही कॉंग्रेसच्या काळातील अतिशय चांगले रस्त होते अन ते फक्त भाजपच्या काळात खराब झालेत अशा रस्त्यांबरोबरही सेल्फी काढला जातो असले सेल्फीश राजकारणी ही असतात.त्यांनाही नाद लागलाय ह्या मानसिक रोगाचा असो राजकारणात नाही जायचय सांगतोय कोण कशाबरोबर सेल्फी घेईल सांगता येत नाही .वर्तमान पत्रात बातमी वाचली अन अशा बर्याच घटना वाचायला मिळतील मोबाईलच्या नादात सहलीला गेल्यावर ग्रृप सेल्फी घेताना खाडीत पडले सर्वच्या सर्व मेले.अशा घटना वाचल्या की सहानभुती नाही पण संतापच जास्त येतो एवढा मोबाईलचा अन सेल्फीचा मानसिक रुग्ण काय सांगाव अशाना ?खर तर ह्या सोशल मिडीयाने मानसाला पक्का मानसिक रुग्न करुऩ टाकलाय.
         लहान मुलाही मोबाईल दाखवल्या शिवाय कार्ट झोपत नाही कारण अनुवंशीकच ना आई वडीलांनी कधी मोबाईल सोडला नाही मग कार्ट कसलं ऐकतय. असो पण हे पुढे खुपच घातक आहे माणूस पाच मिनीटही मोबाईल सोडत नाही. माणसाला सांगितल मोबाईल सोडून सर्व देतो फक्त महीना भर मोबाईल नको दिसायला हात शक्य का ते मुळीच नाही हो शक्यच नाही .
          सेल्फी कुठकुठल्या पद्धतीने लहानांपासून मोठ्या पर्यंत काढतात.ठराविक काळापुरता ठिक आहे पण मानसिक आरोग्य बिघडलय हल्ली त्याच काय?लहान मुलांना मानसोपच्चाराची सद्धा यामुळे गरज पडत आहे. अशा बर्याच गोष्टी आहेत त्यामुळे तरुण वर्गाला मानसोपच्चाराची गरज आहे. सेल्फी हा सुद्धा मानसिक आजारात येवून जातो जेव्हा सतत ची सवय माणसाला मानसिक रुग्ण करुन जाते.असो याविषयी काळजी घ्या .मी तर म्हणेन शिक्षण होई पर्यंत मोबाईल देवू नका .अन अजून बर्याच गोष्टीना आपण बंधन घालू शकतो.
Virendra Sonawane
8888244883

हल्लीची तरुण पिढी आणि वास्तव


Young
विद्यार्थी जीवनात कधी कुठली गोष्ट घडेल सांगता येत नाही. हल्ली परीस्थिती खुप वाईट आहे.आधुनिक युगातील अन संगणक युगातील ही तरुण पीढी आज कुठल्या वळणावर उभी आहे याची काळजी नक्की करायला हवी अन वेळीच सावध होण्याची गरज आहे.
       बारावीत होतो अन बाराविचा शेवटचा पेपर असेल अन पेपर संपला म्हणून आनंदात घरी जात होतो.तर एक मुलगा एका मुलीला छेडत होता . हे दृश्य बघून मनात संताप अनावर झालाच होता पण ?शांत डोक्याने विचार केला मित्राला कॉल केला अन तो आला बिचारीची किमान सुटका तरी झाली त्या पासून , आम्ही त्या मुलाला दम दिला तो तेथून निघून तर गेला पण आज ती मुलगी तिच्या मनाला नक्कीच वेदना झाल्या असाव्यात .किस्सा सांगायच कारण असले रोड रोमीयो बरेच कॉलेज असेल ,क्लासेस असतील तिथेच फिरत असतात.
     अर्पणा ताईंच भाषन वडील फोन वर ऐकवत होते . आम्ही सारं भाषन ऐकलं अन त्यावरील खरं वास्तव आज आपण अनुभवत आहोतच . काय नक्की परीस्थिती आहे . मुलींनी किती जागृत राहण्याची गरज आहे. पालकांनी किती मुलींवर लक्ष द्यायला हवं ,शाळा कॉलेजला पाठवताना किती सतर्क असायला हवं . मुलीला घरापासून लांब पाठवत असताना किती सतर्क असावं ? बाहेरील जगाची बरोबरी नक्कीच मुलींनी करायला हवी . यात शंकाच नाही पण एका चौकटीत मुली असतील किंवा मुलं राहीलीच पाहीजेत. एक वय असत तोपर्यंतच पालक पाल्याला वळण लावू शकतात संस्कार देवू शकतात नंतर फार कठीण होऊन जात. सुसंस्कृत पीढी घडवायची असेल तर मुलामुलानी काही नियम अंगीकारलेच पाहीजेत कारण तुम्हीच उद्याचा भारत आहात. स्त्री पुरुष समानता माझ्या मते तरी होणे कठीण आहे.
          आज बर्याच वेळेला मुलींच्या कमी कपड्यांविषयी विषय होतोच.आपली मुलींकडे बघण्याची मानसिकता कधी बदलेल.त्याही आपल्या बघीनीच असतात.
    प्रेम प्रकरण म्हटलं कि मुल मुली सैराट झालेली असतात तर 14 ते 25 हा वयोगट खुपच सांभाळून राहायला हवं . कारण शारिरीक किंवा क्षणीक सुखासाठी पार आयुष्य  धुळीस मिळत. सध्या प्रेमप्रकरण करायचीच असतील तर धर्मातील समाजीलच मुलगा असेल किंवा मुलगी यांनी जर प्रेम लग्ना पर्यंत प्रेम प्रकरण यशस्वी करता येत असेल तर कराव अन याला आई वडीलांनीही योग्य तो निर्णय घेवून परवानगी द्यायलाही काही हरकत नाही.
    एका नाटकाचा विषय ही असाच होता.त्या एका शाळकरी मुलाच एका मुलीवर प्रेम होत. प्रेम प्रकरणा पर्यंत ठिक होत तिच त्याच्यावर त्याच तिच्यावर जिवापाड प्रेम होत. अन ह्या प्रेमातच आकांत बुडालेली ही दोन कमी  वयातील मुले अस काय पाप हातून करुन बसतात की त्याला तोंड देण कठीण होवून बसतं . कारण ह्याप्रेमाच रुपांतर संभोगात झालेलं असत अन मुलगी प्रेगनंट झालेली असते. मग काय खोट्यावर खोट बोललं जात . शेवटी मुलीचा प्रियकर ठरवतो गर्भ पात करायचा अन ते तस करतात. डॉक्टर गर्भ पात करायला नाही म्हणतात पण यांना करायचाच असतो . शेवटी त्या मुली चे ह्या सार्या प्रकारामुळे प्राण जातात. हि गोष्ट ही कथा सांगायचा उद्देश एकच कि प्रेम प्रकरण कुठ पर्यंत योग्य आहे .
              प्रकरण व्यवस्थित हाताळलं गेलं असं मुलांनी पालकांसमोर चुक मान्य केली असती अन पालकांनीही परीस्थितीची जाणिव ठेवून प्रकरण हाताळलं असतं तर मुलीचे प्राण गेले नसते . आज असल्या क्षणीक शारिरीक सुखामुळे बरीच मुलमुली फसतात.लहान वयातील बुद्धीती तेवढाच विचार करणार त्यात ईश्वरी देणगी. प्रौडावस्थेत झालेले बदल अन त्यावर नसलेला कंट्रोल ह्या मुळेही बर्याच वाईट अन संस्कारहीन कृत्य घडली जातात.त्या खर तर कुणाचा दोष असणार.
          संस्कृती बदलतेय तेवढे तिचे परीणाम ही घातक होत जात आहेत. त्या तरुण पिढी मोबाईल नेट अजून सोशल मिडीया मुळे परीणाम अजून घातक होत आहेत. वेळीच सावध होण्याची आवश्यकता आहेच.हो पण कधी होणार आहात सावध?

Wednesday, 12 December 2018

तुम्हाला शालोम ....अन नमस्ते ....

तुम्हाला शालोम ....अन नमस्ते .... गेली तीन वर्षांपासून अस्त उदय एकपात्री नाटकाचे ५५ प्रयोग माधवजी किल्लेदार यांनी यशस्वीरीत्या सादर केले.ज्यू विषयी लिहिलेलं हे महाराष्ट्रातील पहिलाच एकपात्री प्रयोग. त्या नाटकाविषयी थोडं सांगाव असं वाटतय.
     गेली २००० वर्ष संघर्शीत असलेला ज्यू समाज हिटलर केलेल ते नरकि कृत्य आजही डोळ्यांना पाणी आणण्यासाखाच आहे. त्याकृत्यच अतीव दुःख माझ्या यहुदी बांधवांना नक्की आजही झालाय. यासाऱ्या गोष्टींमुळे म्हणून कि काय ते आजही प्रार्थना स्थळांनामध्ये भिंतीच्या समोर रडतात.
खरंतर या एकपात्रीप्रयोगाचं वर्णन म्हणजे यहुदी अन हिंदू यांच्या मधील बंधु भाव जागृत होतोय. प्रयोगात सांगितल्याप्रमाणे यहुदी अन हिंदू दोघंही भाऊच जरी रक्ताचे नाते नसले तरी संख्या भावप्रमाणे येहुदी.एकपात्रीप्रयोची कहाणी अस्तापासून तर उद्यापर्यंतची हि कहाणी. हर्झलंने सांगितलेली भविष्य वाणी खरी ठरली अन १९४८ मध्ये ज्यू हे नवीन राष्ट्र उदयास आल. आज हि संघर्षित राहावं लागलेलं हे राष्ट्र ,चोहू बाजूंनीं लांडगे लचकेतोडत असताना हे राष्ट्र मोठ्या दिमतीनं त्यांना त्या नराधमांना तोंड देत आहे.
     ह्या एकपात्री प्रयोगाचे आधी झालेले ५५ प्रयोग अन १६ मार्च २०१८ रोजी झालेल्या ह्या महाराष्ट्रातील ज्यू विषयीच्या एकमेव एकपत्री प्रयोगाचे विशेष महत्व होत.कारण प्रयोग ज्यू विषयी विशेष आपुलकी असलेल्या स्वातंत्र्यवीर सावकर यांनी इंग्रजांच्या विरोधात पुकारलेल्या आंदोनाच्या ठिकाणीच झाला.ज्या ठिकाणी सावरकरांनी कपड्यांची पुणे येथे १९०५ साली होळी केली होती. त्यामुळे प्रयोगाला विशेष महत्व प्राप्त झालं. बाबासाहेबांची विशेष उपस्थिती म्हणजे ह्या प्रयोसाठीचा एक अविस्मरणीय क्षण.एकपात्रीप्रयोगाचे लेखक अन ज्यू विषयी वेगळीच आत्मीयतेने सादर करणारे माधवजी यांना बाबासाहेबांची मिळालेली कौतुकाची थाप.अन संपूर्ण सहयोगी कलाकारांचं केलेलं ते कौतुक विशेष महत्व देऊन जात.
     खर तर सुरुवातीला पहिल्या प्रयोगाची माहीती सांगायची तर माधवजी असे कलाकार आहेत ज्या माणसाने फक्त अन फक्त ह्याच प्रयोगासाठी भूमिकेत यावे म्हणून सहा महिने अथक परिश्रम घेतले.एका बंद अंधाऱ्या खोलीत त्यांनी ह्या भूमिकेचा अभ्यास केला.अशा या महान कलाकारासाठी शब्द अपूर्ण पडतील.नाटक हि लिहितांना केलेला ज्यू लोकांविषयी चा त्यांचा अभ्यास, अन जे काही प्रेक्षकांना ह्या प्रयोगानिमित्य नवनवीन माहिती मिळालं त्यामागे खूप मोठा माधव जिचा गाढा अभ्यास. ह्या साऱ्या गोष्टी बाबासाहबांनी ओळखल्या अन कौतुकाची ती थाप. खरंच अविस्मरणीयच.अविस्मर्णीयच ........तुम्हाला शालोम

ही भुत दया ?

ही भुत दया ?
पीएमटीच्या बस थांब्याजवळ उभा होतो अन बर्याच दिवसांपासून बघतोय की पक्षांची विक्री होत असते. तुम्ही कुठला व्यवसाय करावा या विषयी मुळीच काही घेण देण नाही पण पक्षी आझादच चांगले दिसतात. बंदी ठेवून देवाने त्यांना दिलेल्या आयुष्यावर आपण त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत आहोत. पक्षी अन इतर प्राण्यांचा व्यापार कधी थांबेल?ही भुत दया नाही तर प्राण्यांना आपल्या आनंदासाठी त्याच्या आनंदावर केलेला घालाच आहे.त्यांना स्वातंत्र्य नाही दिल तर तोही आपल्याला कसा माफ करेल?वाईट वाटलं खुपच वाईट वाटलं .तीमुक्की आहेत त्याना बोलता आलं असत तर विचार करावा काय झालं असतं.
           माणसाला सर्वच गोष्टीत स्वातंत्र्य हव असत अन ते योग्यच आहे . स्वातंत्र्य हवच नक्की हवय. भारतीय 150 वर्ष गुलाम होते पारतंत्र्यात होते पण स्वातंत्र्यासाठी किती आटापीटा केला अन यशस्वी रित्या उशीरा का होईना भारतीय आपण सारे गुलामीतून मुक्त झालोच. इंग्रजांना पळवून लावलं .मग विचार करा आपण पारतंत्र्यात राहण्याच विचार करु पण शकत नाही मग त्या मुक्या प्राण्यांच काय त्यांनी कुठला उठाव आंदोलन कराव जेणे करुऩ ते पारतंत्र्यातून मुक्त होतील.माणसाच्या सुखासाठी जिभेच्या चोसल्यासाठी माणूस मुक्या प्राण्यांचा जिव घ्यायलाही मागे पुढे बघत नाही.
          देवान प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलय अन ते ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने शास्त्राला धरुन शास्र्ताप्रमाणे उपभोगल पाहीजे.कुण्याप्राण्याचा किंवा त्या बंदिवासात ठेवण्याचा आपल्याला मुळात अधिकारच नाही.प्राण्याला एवढा निसर्ग देवाने त्याच्या मालकीचा केलाय अन आपण देवा विरुद्ध वागून त्या प्राण्याला बंदीवासात ठेवतो. खरतर प्रश्न असा येतो आपल्यात जरा तरी माणूसकी शिल्लक आहे का?कि मानुसकी मेली कधीच.?पक्षी मित्रांनी वेगवेगळ्या पक्षीमित्र संघटनांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
            देवाने वापल्याला सर्व काही प्रांण्यापेक्षा बर्याच चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. माणसाची जेवण्याची पाणी पिण्याची पद्धत ह्या सार्या वेगळ्या आहे ईतर प्राणी मात्रांपेक्षा बुद्धी ही प्रगत आहे.मांसहारी प्राणि जिभेने पाणी पितो तर माणूस तोडाने त्याला देवाने आधीच तशी शाकाहारीच ठेवलय.
       असो जास्त काही लिहीत नाही .पण एक प्राणि मात्रांविषयी आपुलकी वाटली अन लेख लिहीला.

Virendra Sonawane
8888244883

मतदार राजा भाजप आणि काँग्रेस

king of voter
विश्लेषन बरीच वाचून झाली लोकशाही आहे,एक सरकार जाणार दुसरं येणार हे नक्की.फक्त भाजपचीच सत्ता  यावी असही नको व्हायला.जनतेला विकास हवा असतो जनतो ते बघत असते.देश सोशल मिडीया मुळे खुप हुशार झाला आहे.बरीच माहीत सामान्य माणसाला एक क्लिक वर मिळत आहे.तेव्हा जनता विकास मागते.निकालाच विश्लेषन झाल पण जनतेच्या मताच विश्लेषन कोण करेल.
     निवडणूक हारण्याचे बरीच कारण शोधली जातात.पण सध्याच्या सोशल मिडीया च्या युगात निवडणूकीत मत कुणाला द्या यावर बरीच चर्चा झालेली असते.अन मतदार पक्ष न बघता उमेदवाराला मत देतो.दुसरं एक बरीच वर्ष असणारी सत्ता जनता उलथवुन टाकते.जनता बाकी राजकरणाकडे मनोरंजनाने बघते तर मतदान करण्याच्या वेळेला बरोबर हवं तेच करते.आज बरीच सुशिक्षित तरुण पिढी उमेदवार कसा तो जनतेचा काम करेल का हेच बघत असते.
        पाचही राज्यांच्या निवडणूकीत भाजपचा दारुण पराभव जरी झाला असेल तरी त्याचा भविष्यात लोकसभा निवडणूकांवर काही परीणाम होईल असा विचार करऩ चुकीच ठरेल.2014 मध्ये भाजप जवळ किती राज्य होते आता किती आहेत यावरुनही आपण निष्कर्ष काढू शकतो.राज्याच्या निवडणूकीत अन देशाच्या निवडणूकीत फार फरक असतो.तरी भाजपची विजयी घोडदोड थांबली असली तरी यातून राहूल गांधींच नेतृत्व सिद्ध झाल अस म्हणू शकत नाही.कारण निवडणूक  निकालांची आकडेवारी पाहीली तर भाजप निसटत्या फरकाने हारलाय.नेतृत्वात अजून परीपक्वता असती तर पुर्ण बहूमत मिळालं असत. 2014 ते 2018 पर्यंत ज्याही निवडणूक झाल्या तिथे भाजप पुर्ण बहूमताने विजयी झालाय.त्रिपुरा सारख्या राज्यात तर एकही आमदार नसताना बहूमता निवडून येण फक्त मोदी आणि अमित शहाच ही जादू करू शकतात.अजून लोकसभेची निवडणूक आहे.  अन पंतप्रधान पदाचा उमेदवार भाजप सह कॉंग्रसलाही घोषित करावा लागेल. शेतकर्यांकडेही विशेष लक्ष भाजपने द्याव.
       कर्नाटक,मध्यप्रदेश,राजस्थान यां राज्यांमध्ये भाजप निवडणूकीनंतर पुन्हा सत्तेवर येऊ शकतो. अशी आकडेवारीच सांगत आहे.तेव्हा मोदी शहांची रणनिती काय असेल हे पाहण्यासारखे असेल.मोदीं अन शहा यांची बरोबरी सध्यातरी राहूल होऊ शकत नाही. राहूल अजून बरीच मेहनत करावी लागेल.जनते समोर स्वत:ला सिद्ध कराव लागेल.पंतप्रधान उमेदवार होऩं सद्ध्यातरी तेवढ सोप नाही आहे.भाजप स्वबळावर जरी लढला तरी बहूमतापर्यंत येऊ शकतो.अन मोदींनी जनतेचा अजून विश्वास संपादन केलाच आहे. मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित असेच मुळीच झालेले नाही.बर्याच वर्षांची तपश्चर्येच फळ म्हणून पंतप्रधान उमेदवारी त्यानंतर पुर्ण बहूमतासह सरकार आणलय.पक्षाबरोबर मोदींची स्वत:ची कताकदही बरीच होते.आधी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वत: सिद्ध केलं तेव्हा त्यांना विरोधी पक्षातील मतपण मिळाली.लोक मोदींना जिंकवण्यासाठी विदेशातूनही आली आहेत. मोदींनी स्वत:च एक कँम्पन ही सुरु केलं होत. पण राहूल कडून हे सारं होणं तेवढस सोप नाही. कुण्या एका घराण्यामुळे ते पंतप्रधान होतील ते दिवस गेले आहेत आता नक्कीच नाही ते दिवस .बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परीस्थिती आहे. विकास दाखवा नाही तर मत नाही.राहूलला याच कसोठीवर उतराव लागणार  हे नक्की.

खांदेशीसंस्कृतीच्या पाऊल खुणा



अहिराणी भाषा म्हटली म्हणजे खान्देश अन त्यात मुखत्वे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक असा एकूण खान्देश प्रदेश येतो.मराठी अन अहिराणी या दोन भाषांमध्ये बराच फरक आहे.खानपान,राहणीमान,बोलणे वगैरे बराच फरक आहे.बैलपोळा,आखाजी,खोपडी एकादशी, अश्या सणांची परंपरा खान्देशात आहे.
कष्टकरी खान्देशी शेतकऱ्यांच नवीन साल हे अक्षय तृतीया म्हणजे आखाजी पासून सुरु होत.घरात मृत झालेल्या व्यक्तीला स्मरण म्हणून डेरगं (मडकं )पण आखाजीला भरतात.सासुरवाशीण आखाजीची वाटपाहतच असते. "आखाजी दिवायी सव महिना महा उणी भाऊ म्हणा मले ल्हीई पयना"अशी म्हण खान्देशात प्रचलित आहे.

आखाजी म्हणजे अक्षय तृतीया हादिवस साडेतीन मुर्हुतापैकी  एक . खाणदेशात ह्या दिवसाच महत्व खुप .आमच्या गावाकडे गेल्या कित्येक वर्षांपासुन रामलीला होते.संपूर्ण खांदशात ही परंपरा फक्त आमच्या गावी होते. या रामलीलेच विश्लषन करताना त्यातील बर्यागोष्टी सांगतोय
पथनाट्यासारखा हाही एक प्रयोग.संपूर्ण नाटक म्हणजे 6 ते 8 तासांपर्यंत हा प्रयोग चालतो.रात्री 10वा.चालु झालेला प्रयोग सकाळीच 6 वाजता संपतो.थोडा अहिराणीत तर थोडा मराठी तेही खांदेशी मराठी मध्ये होतो.ह्याप्रयोगात संपूर्ण गावच सहभागी होते. तसेदोन दिवस म्हणजे तब्बल 16 तास हा प्रयोग वीणा कुठला खर्च गावाच्या वर्गणीत  चालतो.संगीतही एकच विशिष्ट प्रकारच असत. संपूर्ण कथाही खुप वर्षांपूर्वी कुणीतरी गावकर्याने लिहीलेले अप्रतीम कथानक प्रयोग बघायला खेडोपाडी सर्वच बघायला येतात. आख्खी रामायण ह्यात पूर्ण केली गेलीय . नाटकाच्या मध्यांतरात काही काळ अहिराणीत बतावणी वगैरे सारखा एक प्रकार होतो. रावणाचे ते दहा तोंड ,शंकराचे वाहन नंदी बैल,ही पात्र साकार करणे खुपच  कठीन कारण 20 ते 25 किलो वजन एक व्यक्ती उचलून त्यासह संवाद अन पावटी धरतो. रावणाच्या वधाच्या वेळेची ती शेरोशायरी अप्रतिम असते.
बर्याच नाटकाना पथनाट्यांना खुपच खर्च लागतो पण कमी खर्चात होणार हे नाटक एक वेगळच  महत्व देऊन जातो.संपूर्ण वेषभुषाही गावातील व्यक्तीच करतात.
      जे काही पात्र पेहराव मुखवते परीधान करतात त्याना  सोंग म्हणतात. ह्यांना खुप भक्तीभावाऩे दहीभाताचा नैवद्य दिला जातो नंतरन संपूर्ण गावाला जेवण असते त्याचा प्रसाद म्हणून .वर्षांवर्षे चालत आलेली ही परंपरारा गावकर्यांचा श्रद्धेचा अन अस्तेचा विषय आहे
कष्टकरी खान्देशी शेतकऱ्यांच नवीन साल हे अक्षय तृतीया म्हणजे आखाजी पासून सुरु होत.घरात मृत झालेल्या व्यक्तीला स्मरण म्हणून डेरगं (मडकं )पण आखाजीला भरतात.सासुरवाशीण आखाजीची वाटपाहतच असते. "आखाजी दिवायी सव महिना महा उणी भाऊ म्हणा मले ल्हीई पयना"अशी म्हण खान्देशात प्रचलित आहे.आखाजीतील उन्हामुळे जमीन पण पाण्यासाठी तहानलेली असते.आला पाऊस मातीच्या वासात गं मोती गुंफीत मोकळ्या केसांत"अस म्हणत गौरी गणपतीची स्थापना होते. सासुरवाशिणी लाकडाच्या गौरीची मनोभावे व्रत करतात.तशातच पावसाळा येतो.
मृगाच्या सरींनी शेत भिजून निघते. कष्ट करी शेतकरी पण आभासुन पाऊसाची वाट पाहताच असतो.पावसाच्या सरींनी शेतकरी पण सुखावतो.शेतकऱ्यांच्या कष्टाचा वाटेकरी असणारा प्राणी म्हणजे बैल.बैल पोळा म्हणजे शेतकऱ्याने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण. यादिवशी पूर्ण विश्रांती बैलांना दिली जाते.सजवून त्यांना गोडधोड करून आई मारी च्या ग्राम दैवतांपर्यंत वाजत गाजत फिरवून आणलं जात.प्राण्यांप्रती भूतदया असणारा हा सण बैलपोळा.बैलपोळ्यानंतर गणरायाचे वाजत गाजत आगमन होते. अनंत चतुर्दशीच्या विसर्जननंतर कुमारिका गुलाबाईची स्थापना करतात. महिन्याभर गुलाबाईंचा मुक्काम असतो. दररोजचा गोडधोड खाऊ ती गीते.
    नेहमीचे पारंपरिक सण खान्देशात अमाप उत्साहाने खान्देशी लोक साजरे करत असतात. परंतु काही वैशिष्ट्य पूर्ण सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.हे सण खान्देशातील संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत.खान्देशातील परंपराचालिरीतीचे दर्शन आपल्याला ह्या सणांमधून घडते. .खान्देशातील ग्रामदैवत कान्हबाई ,भालदेव,गौराई इत्यादी सण अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात.कान्हबाईची स्थापना केली जाते.भाऊबंदकीतील सर्व एकत्र येतात. रोट आणि इतर पक्वान्नाचे जेवण करतात.कान्हबाईची मिरवनुक काढली जाते.अशा पद्धतीने हा सण साजरा केला जातो.
१९१६ साली बांधलेले तत्वज्ञान मंदिर अमळनेर येथे सुप्रसिद्ध आहे. काही पेशवेकालीन मंदिरही आहेत. अंबर वृषीची समाधी देखील अमळनेर येथे आहे. साने गुरुजींची कर्म भूमी अमळनेर तेथे आहे. सुरत लूट झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज या अमळनेर मार्गानेच सुरतला गेले होते.सखाराम महाराजांच्या पालखी येथे प्रसिद्ध आहे. मे महिन्यात येथे यात्रा भरते. उत्तर मध्ययुगापासून परकोट होता. हे गाव धान्य आणि कापूससाठी प्रसिद्ध होते. इंग्रजांच्या काळात येथे व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढला.उंदीरखेडे ता पारोळा येथे नजरदेव सुनपदेव अशी दोन गरम पाण्याची झरे आहेत. अश्व्तथामा विषयी कथा या गावाशी जोडल्या आहेत.कानाशी ता भडगाव येथे महानुभाव पंथीयांच्या कृष्णाची मंदिर आहेत.फरकांडे ता एरंडोल पासून १६ किमी अंतरावर हे गाव असून येथे हलत्या मनोऱ्यासाठी प्रसिद्ध आहेत.पाटणे वाघळी वाडगाव येथे यादवकालीन मंदिरे आहेत. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने धरणगाव पावन झाल आहे.
     एरंडोल येथे पांडव काळातील एक चक्र नगरी काही काळ पांडवांचे वास्तव्य होते.पद्मालय येथे भीमकुंड प्रसिद्ध आहे.पद्मालय गणपतीचे जागृत देवस्थान आहे.धुळे येथे अशमयुगीन वसाहती आढळल्या आहेत. एकविरामाता हि येथील ग्रामदेवता.पिपळनेर येथे शतकापासूनचे अवशेष येथे सापडले आहेत.
    अशा पद्धतीने खान्देश हा मध्ययुगीन अन यादवकालीन साठी प्रसिद्ध आहे. त्यानुसारच खान्देशात अहिराणी चित्रपट सुद्धा खान्देशात प्रसिद्ध आहेत. बी कुमार यांनी अहिराणी चित्रपट तयार केले खान्देशात ते खूप प्रसिद्ध आहेत. मागल्या वर्षीच त्यांना देवाज्ञा झाली.महामहिम राष्ट्रपती याही खांदेशातीलच आहेत.बहिणाबाई चौधरी यांच्या विषयी काही लिहिण्याची गरजच नाही. बहिणाबाही हा असंकाही चमत्कार खान्देशातील आहे कि अडाणी असूनही काही लिहिता वाचता येत नसूनही संपूर्ण आयुष्यातील अनुभव त्यांनी कवितेच्या माध्यमातून प्रकट केले आहेत.
गिरणा तापी वाघूर या नद्यांनी समृद्ध प्रदेश म्हणजे खान्देश.प्राचीन काळापासून वैशिठ्य पूर्ण खांदेश खांडववन, ऋषिक, दानदेश, स्कंददेश, कान्हदेश (खान्देश) अशा बऱ्याच नावांनी ओळखला जातो.ठसकेबाज अशी अहिराणी कष्टाळू शेतकरी तसेच झणझनीत शेवभाजी वांग्याच भरीत अशी खाद्यसंस्कृती असलेला खान्देश.
वांग्याचं भरीत अन शेवभाजी म्हणजे खान्देश असा समीकरणच बनून गेलय.जसे पुणे म्हटलं की, जोशींचे वडे आठवतात. त्याप्रमाणे खान्देश म्हटलं की, वांग्याच्या भरीताने तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. खान्देशी भरताची चव लय भारी असल्याने खान्देशातल्या वांग्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून तर मागणी आहेच; परंतु आता इतर राज्यांतही ही वांगी आवडीने खाल्ली जातात.पुण्यातील खान्देश जंकशन म्हणून एक सदाशिव पेठेतील हॉटेल आहे. तिथे वांग्याचं झणझणीत भरीत,वरण बट्टी,पातोळ्यांची भाजी अशा बऱ्याच पदार्थ खाण्यासाठी रांगाच लागतात.
विरेंद्र सोनवणे
माहिती संकलन
अनाजधुन